Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रवेश अर्ज 20 नोव्हेंबर पर्यंत सादर करा - जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे

खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रवेश अर्ज 20 नोव्हेंबर पर्यंत सादर करा - जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे


सांगली, दि. 15,  : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत दि. 5 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हरियाणा या ठिकाणी होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स करीता महाराष्ट्र राज्याच्या खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल या क्रीडा प्रकारातील संघाची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा तथा निवड चाचणीचे आयोजन करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी व विभागीय उपसंचालक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्यामार्फत खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हास्तरावर करण्याचे निश्चित झाले आहे. यासाठी सहभागी होणाऱ्या संघानी प्रवेश अर्ज विहीत नमुन्यामध्ये संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यानिशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 20 नोव्हेंबर 2021 पूर्वी सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.

जिल्हास्तरावर आयोजन करण्यात येणाऱ्या खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल या क्रीडा स्पर्धांमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व क्रीडा मंडळे यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणारा खेळाडू दि. 1 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहिती करीता राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार (मो. नं. 9403968625/661) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहनही श्री. वाघमारे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.