Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्पा मसाजसाठी पाठवला मेसेज, 150 कॉलगर्ल्सची मिळाली 'रेट लिस्ट'

 महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्पा मसाजसाठी पाठवला मेसेज, 150 कॉलगर्ल्सची मिळाली 'रेट लिस्ट'


नवी दिल्ली : सोशल मीडियाचा वापर एकीकडे चांगल्या कामासाठी होताना दिसत आहे, तर दुसरीकडे याचा गैरवापर सुद्धा होत आहे.

सोशल मीडिया हे लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करत असताना दुसरीकडे सहजासहजी अवैध धंदे करण्याचे ठिकाणही बनत आहे. याचा पुरावा दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल  यांच्यासोबत घडलेल्या घटनेत आढळून आला आहे. दरम्यान, स्वाती मालीवाल यांना सोशल मीडिया साइट जस्टडायलवर  स्पा मसाजसाठी  माहिती मिळवायची होती. त्यामुळे त्यांनी जस्टडायलवर मेसेज केला. त्यानंतर त्यांना 150 हून अधिक कॉलगर्लचे रेट सांगण्यात आले.

स्वाती मालीवाल यांचे ट्विट

या घटनेची माहिती स्वतः स्वाती मालीवाल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले की, "आम्ही जस्टडायलवर कॉल करून स्पा मसाजची खोटी चौकशी केली, त्यानंतर आमच्या फोनवर असे 50 मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी करत आहे, या धंद्याला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय आहे?"


जस्ट डायल आणि पोलिसांना समन्स

दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. जस्टडायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य ती कारवाई करेन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही, असे दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीत स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती आहे. या ठिकाणी पोलीस वेळोवेळी छापे टाकतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.