Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्लडप्रेशर मोजताना 120 आणि 80 हे रिडिंग असण्यामागील काय असतो अर्थ?

 ब्लडप्रेशर मोजताना 120 आणि 80 हे रिडिंग असण्यामागील काय असतो अर्थ?


नवी दिल्ली, 2 : वाढत्या अपेक्षा आणि स्पर्धेमुळं माणसाचं जीवन धकाधकीचं बनलं आहे. चुकीचा आहार, व्यायामाचा तसेच पोषक आहाराचा अभाव यामुळे अनेकांना विविध आजारांना अत्यंत कमी वयातच सामोरं जावं लागत आहे.

हृदयविकार  हा त्यापैकीच एक. हृदय विकारासाठी ताणतणाव, चुकीचा आहार, लठ्ठपणा, अनुवंशिकता आदी गोष्टी कारणीभूत ठरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हृदयविकार असलेल्या रुग्णासाठी ब्लडप्रेशर  किंवा रक्तदाब हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सामान्यतः 120-80 दरम्यान असलेलं ब्लडप्रेशर हे नॉर्मल समजलं जातं.

अर्थात त्याला वय, वजनासारख्या अन्य गोष्टीही कारणीभूत असतात. मात्र ब्लडप्रेशर मोजताना 120-80 ही रेंज नेमकी काय दर्शवते. शुगर किंवा अन्य रक्ताच्या चाचण्यांमधील आकडे हे एक अंकी असताना ब्लडप्रेशरचे आकडे हो दोन का असतात, असा अगदी सहज प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. याबाबतची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे ब्लड प्रेशर तपासायला जाता तेव्हा तपासणी मशीनवर तुम्हाला 120-80 किंवा त्यापेक्षा अधिक अथवा कमी रिडिंग दिसतं. यावरून तुमचं ब्लडप्रेशर किती आहे, हे समजतं आणि त्यानुसार डॉक्टर तुम्हाला सल्ला आणि औषधोपचार सांगतात. मात्र 120 आणि 80 हे दोन रिडिंग असण्यामागं एक कारण आहे. ते म्हणजे ब्लडप्रेशर हे दोन प्रकारात असतं.


एक सिस्टॉलिक  आणि दुसरं डायस्टॉलिक . अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा रुग्ण म्हणतो माझं ब्लडप्रेशर वाढलंय म्हणजेच सिस्टॉलिक रिडिंग जास्त आहे. एखादा रुग्ण म्हणतो माझं ब्लडप्रेशर लो झालंय म्हणजेच डायस्टॉलिक रिडिंग कमी दिसतंय. हे ही हिवाळ्यात खोकला-सर्दी-तापाला करा बाय-बाय; आहारात घ्या या महत्त्वाच्या 7 गोष्टी जेव्हा रक्तवाहिन्यांवरील दाब वाढतो तेव्हा ब्लडप्रेशर हाय म्हणजेच उच्च होतं.

अशा स्थितीत हृदयाची गती वाढलेली असते, तसंच ताणदेखील वाढलेला असतो. मात्र जेव्हा रक्तवाहिन्यांचं कार्य काहीसं मंदावतं आणि रक्त शरीरातील सर्व भागांत पोहचू शकत नाही, तेव्हा ब्लडप्रेशर लो होतं. जेव्हा ब्लडप्रेशर तपासणी मशीन हाताला लावलं जातं, तेव्हा त्यावर एका रिडिंगच्या बाजूला SYS आणि दुसऱ्या रिडिंगच्या बाजूला DYS असं लिहिलेलं असतं. SYS म्हणजे सिस्टॉलिक आणि DYS म्हणजे डायस्टॉलिक ब्लडप्रेशर होय.

यात सिस्टॉलिक म्हणजे जेव्हा हद्य रक्त पंप करतं. तर डायस्टॉलिक म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पंप करण्यातील अंतर होय. रक्ताचं पंपिंग  आणि वाटपाचं काम हे हृदयाचं असतं. त्यामुळे ब्लडप्रेशर हे हद्याच्या कामावर अवलंबून असतं. त्यामुळे हृदयविकारात ब्लडप्रेशर मोजणं आणि त्याचा तपशील महत्त्वाचा ठरतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.