Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कंबोजवर 1100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप; भाजपामध्ये प्रवेश करताच कारवाईला स्थगिती- मलिक

 कंबोजवर 1100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप; भाजपामध्ये प्रवेश करताच कारवाईला स्थगिती- मलिक



मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्स प्रकरणामुळे सध्या चर्चेत असलेले मोहीत कंबोज हे वानखेडे यांचे साथीदार असून तेच आर्यनखान प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

कंबोज यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांनी 1100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये आणि आता भाजपामध्ये गेलेल्या नेत्याच्या मागे फिरत होते. सरकार बदलल्याने त्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. दिंडोशीतून निवडणूक लढवली, मात्र पराभूत झाल्याने त्यानंतर त्यांना भाजप युवा मोर्चाचे पद देण्यात आले. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या घरावर सीबीआयची धाड पडली होती. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने चौकशीच बंद झाल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

मेव्हुण्याच्या मदतीने कट रचला

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, मी 9 ऑक्टोबरला एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी एससीबीचे अधिकारी वानखेडे यांनी सात ते आठ लोकांना अटक केल्याचे व्हिडीओमधून दिसून येत होते. मात्र कीती लोकांना अटक करण्यात आली? याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. किती लोकांना अटक केली आहे, याचा खुलासा वानखेडे का करत नाही असा सवालही मी त्यावेळी उपस्थित केला होता. त्यानंतर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन 14 लोकांना अटक केल्याचे सांगितले, मात्र अटक झालेल्या आरोपींची नावे त्यांनी सांगितली नव्हती. घटनास्थळावरून यातील तीघांना अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा, ऋषभ सचदेव यांना त्यांचे कुटुंबीय घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे तिघे कंबोज यांचे मेव्हुणे असल्यानेच त्यांची सुटका करण्यात आली, व आर्यन खानला खंडणीसाठी या प्रकरणात आडकवण्यात आले. कंबोज यांनी आपल्या मेव्हुण्याच्या मदतीने हा कट रचल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

कंबोज, वानखेडेंचे चांगले संबंध

आर्यन खान हा क्रुझ पार्टीवर स्वत: गेला नाही, त्याला बोलावण्यात आले होते. कंबोज यांचे मेव्हुणे असलेल्या प्रतिक गाभा आणि सचदेवने त्याला पार्टीसाठी बोलवले होते. आणि त्यानंतर पद्धशीरपणे प्लॅन करून त्याला अडकवण्यात आले. हा किडनॅपिंगचा प्रकार असून, कंबोज हा या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. ते खंडणी वसूल करण्याचे काम करतात. त्यांचे आणि वानखेडे यांचे चांगले संंबंध आहेत, याबाबतचा एक व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे देखील मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान सात तारखेला वानखेडे आणि कंबोज ओशिवरा स्मशानभूमीजवळ भेटल्याचा गौप्यस्फोट देखील यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे. ड्रग्सचा धंदा सुरूच राहावा असे वानखेडेंना वाटत असून, ते याच्या नावाखाली बॉलिवूडमधील कलाकारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.