Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वसंतरावदादा पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त सांगली येथील समाधी स्थळी धार्मिक वातावरणात अभिवादन

वसंतरावदादा पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त सांगली येथील समाधी स्थळी धार्मिक वातावरणात अभिवादन



सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी वसंतरावदादा पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त सांगली येथील समाधी स्थळावर सांगली जिल्ह्यातील मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन व आरती झाली. सर्वधर्मीय धर्मगुरूंनी दादांच्या कार्याचा आढावा घेऊन प्रार्थना करत अभिवादन केले. 

महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजाभाभी पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिकदादा पाटील, काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री ताई पाटील यांच्यासह नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

ख्रिश्चन धर्मगुरू प्रकाश काळे, बौद्धधर्मियांच्या वतीने हनुमान साबळे, मुस्लिम धर्मियांच्या वतीने हाजी अमिनुद्दिन इमादुद्दिन मुल्ला, प्रजापिता ब्रह्मा कुमारीज निवेदीता बहनजी, शिका धर्मीय मोहन सिंग यांनी प्रार्थना केल्या.

वसंत दादा यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करावी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सर्वांनी राहावे असे आवाहन सर्व धर्मगुरूंनी केले. यावी सदानंद कबाडगे यांनी दादांच्या जीवनावर विचार मांडले.

यावेळी पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील, जे के बापू जाधव, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उत्तम साखळकर, वसंतदादा साखर कारखान्याचे व्यवस्थापक संजय पाटील, पी एल रजपूत, करीम मिस्त्री, गंगाधर तोडकर, सुभाष गुरव, दिलीप पाटील, संजय हजारे, श्रीपाल तात्या चौगुले नगरसेवक मयूर पाटील, अमित दादा पाटील, सर्जेराव पवार, गुंठेवारी समितीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण, खंडेराव जगताप, रघुनाथ पाटील, अशोक पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्याच्या विविध भागातून नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.