Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पणजी येथे डाक पेन्शन अदालत 1 ‍डिसेंबरला

 पणजी येथे डाक पेन्शन अदालत 1 ‍डिसेंबरला



सांगली, दि. 15, : पोस्टमास्तर जनरल गोवा रिजन, पणजी यांच्या कार्यालयामध्ये गोवा रिजन मधील निवृत्ती वेतन धारकांसाठी डाक पेन्शन अदालत 1‍ डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजित केली आहे. गोवा रिजन मध्ये गोवा राज्य, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा यांचा समावेश होतो. या डाक पेन्शन अदालतीमध्ये तक्रार दाखल करण्याचा अंतिम दिनांक 20 नोव्हेंबर 2021 आहे. अशी ‍माहिती प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी दिली.

जे टपाल विभागातूननिवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे अशा निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधीत तक्रारीचे जर 3 महिन्याच्या आत निवारण झालेले नसेल तर अशा प्रकरणांचा या डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार आहे. पेन्शन अदालतमध्ये नितिगत प्ररकण अर्थात उत्तराधिकारी  तथा धोरणात्मक स्वरूप संबंधी तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारक ‍ सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन, पणजी-403001 यांच्या नावे ‍दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा यापूर्वी अर्ज पाठवू शकतात, असे प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.