Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Squid Game App डाउनलोड करणं पडू शकतं महागात

 Squid Game App डाउनलोड करणं पडू शकतं महागात

नेटफ्लिक्सच्या Squid Game वेब सीरिजने कमी वेळात खूप लोकप्रियता कमावली आहे. या सीरिजमूळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. या प्रसिद्धीचा फायदा काही हॅकर्स देखील घेत आहेत. स्क्विड गेमच्या नावाने अनेक अ‍ॅप गुगल प्ले स्टोरमध्ये दिसू लागले आहेत. असच एक अ‍ॅप Google ने Play Store वरून बॅन केलं आहे.

गुगल प्ले स्टोरवर Squid Game Wallpaper 4K HD हे उपलब्ध होतं. यात मालवेयर असल्याची माहिती सिक्यॉरिटी फर्म ESET चे तज्ज्ञ Lukas Stefanko यांनी दिली होती. विशेष म्हणजे या अ‍ॅपमध्ये जोकर मालवेयर आहे. जे याआधी देखील अनेक अ‍ॅप्समध्ये आढळून आलं आहे. फक्त यावेळी या मालवेयरने लोकप्रिय वेब सीरिजच्या नावाचा वापर केला होता.


Squid Game Wallpaper 4K HD चा धोका

Squid Game Wallpaper 4K HD हे अ‍ॅप अधिकृतरित्या 5,000 युजर्सनी डाउनलोड केलं होत. अनधिकृतपणे इतर अँड्रॉइड अ‍ॅप स्टोरमधून हे अ‍ॅप किती स्मार्टफोन्सवर इन्स्टॉल आहे हे मात्र सांगता येत नाही. या अ‍ॅपवर युजर्सना खोट्या जाहिराती आणि SMS सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून गंडा घातला जातो. युजर्सना त्यांच्या परवानगीविना पेड सर्व्हिसेसचे सब्स्क्रिप्शन दिले जाते. त्यामुळे युजर्सची पैसे जात राहतात.

Squid Game Wallpaper 4K HD वर गुगलने कारवाई केली आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोरमधून बॅन करण्यात आलं आहे. जर तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप असल्यास त्वरित अनइन्स्टॉल करा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.