Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जर तुम्ही सुद्धा विकत असाल Old Coin किंवा Note तर जाणून घ्या 'ही' मोठी बाब, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

जर तुम्ही सुद्धा विकत असाल Old Coin किंवा Note तर जाणून घ्या 'ही' मोठी बाब, RBI ने जारी केली महत्वाची सूचना




नवी दिल्ली :   मागील काही दिवसांपासून जुनी नाणी आणि नोटा  विविध वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी-विक्रीचा ट्रेंड वाढला आहे.

या प्लॅटफॉर्मवर दुर्मिळ नाणी आणि नोटांना चांगला भाव मिळत असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. तसेच खरेदी-विक्रीसाठी विविध दावे करण्यात येत आहेत. याबाबत RBI ने नुकतीच एक सूचना जारी केली आहे.

RBI ने सावध करत म्हटले आहे की, काही फसवणूक करणारी तत्व ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी केंद्रीय बँकेच्या नावाचा आणि लोगोचा वापर करत आहेत.

जर तुम्हीसुद्धा जुनी नाणी आणि नोटा विकणे किंवा खरेदीच्या तयारीत  असाल तर सावध व्हा. ऑनलाइन फसवणूक करणारे लोक सातत्याने ग्राहकांना चूना लावण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी ते रोज नवनवीन पद्धत शोधून काढतात. कारण फसवणूक करणारे हे लोक जुनी नाणी आणि नोटा विकण्यासाठी लोकांकडून शुल्क, किंवा टॅक्स मागत आहेत.


RBI ने ट्विटमध्ये काय म्हटले…

रिझर्व्ह बँकेने आपल्या वक्तव्यात स्पष्ट म्हटले आहे की, आरबीआय अशाप्रकारच्या हालचालींमध्ये सहभागी नाही आणि अशाप्रकारच्या ट्रांजक्शनसाठी कुणाकडून कोणतेही शुल्क किंवा कमिशन सुद्धा कधी मागितले जाणार नाही. 

आम्ही कोणतीही संस्था किंवा व्यक्तीला अशाप्रकारच्या कामासाठी कोणतेही अधिकार दिलेले नाहीत.

RBI सोबत कुणाचीही नाही डील

भारतीय रिझर्व्ह बँक अशाप्रकारच्या प्रकरणात डील करत नाही आणि कधीही कुणाकडून शुल्क किंवा कमिशन मागत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने एखादी संस्था, कंपनी किंवा व्यक्तीला अशाप्रकारच्या ट्रांजक्शनवर बँकेच्या वतीने शुल्क किंवा कमीशन घेण्यासाठी कोणतीही अथॉरिटी दिलेली नाही.

भारतीय रिझर्व्ह बँक सामान्य लोकांना अशाप्रकारच्या बनावट आणि फसवणूक करणार्‍या ऑफर्समध्ये न फसण्याचा सल्ला देत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.