जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा या मागणीसाठी आज शुक्रवार दि २९ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यभर NPS हटाब दिन पाळून १ तासाचे ठिय्या आंदोलन ...
दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचा-यांना केंद्राप्रमाणे नवीन अंशदायी पेन्शन योजना (NPS ) लागू करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सन २०१३ मध्ये संसदेत PFRDA कायदा मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाने सैनिकी विभागाला NPS योजनेतून वगळणेत आलेले आहे. म्हणजेच नवीन NPS योजना जुन्या परिभाषित पेन्शन योजने इतकी लाभदायक नाही म्हणूनच देशातील सैनिकी विभागाला जुनी परिभाषित योजना कायम ठेवण्यात आली आहे.
आयुष्याच्या सरत्या काळात जे सामाजिक सुरक्षा आहे. NPS योजनेतून जमणारे अंशदान फंड मॅनेजरव्दारे शेअर बाजारात गुंतविण्याची मुभा देणेत आलेली आहे. त्यामुळे सटटा बाजाराच्या चढउताराच्या खेळात जगण्यासाठी आवश्यक असणारे रेन्शन-धन किती मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे ही । योजनाच कर्मचा-यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यात नवीन NPS योजना रददबातल करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा अशी आग्रहाची मागणी गेले १६ वर्ष संबंधीत कर्मचारी करत आहेत.
राज्यातील एक उमदे नेतृत्व माना देसाई वित राज्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दि.४.१०. २०२१ रोजी राज्य शासनाने स्थापित केलेल्या अभ्यास समितीच्या माध्यमातून चर्चा संपन्न झाली. गेल्या १६ वर्षात केंद्र शासनाने केंद्रीय NPS). धारक कर्मचा-यांसाठी बदलत्या काळानुरूप काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. जसे आकस्मिक निधन झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना कुटूंब निवृत्ती वेतन, ग्रॅच्युएटी वगैरे महाराष्ट्र शासनाने याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे सुध्दा सर्वदूर महाराष्ट्रातील सबंधीत कर्मचारी नाराज आहेत NPS धारकाच्या उपरोक्त समस्यांकडे शासनाचा लक्षवेध करुन घेण्यासाठी शुक्रवार दि. २९ ऑक्टो २०२१ रोजी राज्यभरे राष्ट्रीय पेन्शन योजना हटाव दिन पाळून सकाळच्या सत्रात -महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी-निमसरकारी चबालयासमोर ठिय्या आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. आपण वरील वस्तुस्थितीचा सकारात्मक विचार करून राज्यातील NPS धारक कर्मचा-यांना दिलासा द्याल अशी आम्हास खात्री वाटते. ही नम्र विनंती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.