Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मलिका आता वानखेडेवर वैयक्तिक आरोप करतायत? यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत सवाल

 मलिका आता वानखेडेवर वैयक्तिक आरोप करतायत? यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत सवाल


मुंबईः मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगाबाहेर आला असला तरी या प्रकरणाचा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत आणखी एक गौप्यस्फोट केलाय.

त्यामुळे एकच खळबळ उडालीय. समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडेही मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय.

वानखेडेंची भावोजीला तुरुंगात डांबण्याची धमकी

ओळख लपवण्यासाठी समीर वानखेडेंनी भावोजीला तुरूंगात डांबण्याची धमकी दिली. समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीशी झालेल्या निकाह नाम्यातही अब्दुल अझीजचं नाव आहे, पण अब्दुल मूळचा सुरतचा असल्याचं ते म्हणालेत. ट्विट करत त्यांनी या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप केलाय.

ओळख लपवण्यासाठी अब्दुल अझीजसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती

यास्मिन खान हिचं खान अब्दुल अझीजसोबत लग्न झालंय. ओळख लपवण्यासाठी अब्दुल अझीजसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळालीय. अब्दुल अझीज सध्या इटलीमध्ये आहे, दोघांना एक 10 वर्षांचा मुलगा असल्याची माहिती समोर येतेय. तसेच भारतात आल्यास तुरुंगात टाकेन, अशी समीर वानखेडेंकडून अब्दुल अझीजला धमकी दिल्याचाही दावा केला जात आहे.

मलिकांच्या टार्गेटवर याआधीही यास्मिन वानखेडे ?

नवाब मलिक यांनी 16 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन लेडी डॉनच्या मुद्दयावरून वानखेडेंना काही प्रश्न केले होते. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला होता. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं होतं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता. तसेच फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले होते.

 

कोण आहेत यास्मिन वानखेडे?

मलिक यांनी ज्यांचा लेडी डॉन असा उल्लेख केला. त्यांचं नाव यास्मिन वानखेडे असं आहे. यास्मिन वानखेडे या समीर वानखेडे यांच्या बहीण आहेत. यास्मिन वकील आहेत. त्या मनसेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा असून मनसेचं कायदेशीर कामही पाहतात. तसेच त्या महिलांच्या विविध समस्या सोडवण्याचेही काम करतात, अशी माहिती यास्मिन वानखेडे यांनी दिली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.