पूरग्रस्तांचा निधी न देणार्या जिल्हाधिकारी यांच्या हाताला लकवा मारला की काय; माझी प्रवक्ता संतोष पाटील.
काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते व महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम साहेब व जिल्ह्याचे पालक मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्तांसाठी महा विकास आघाडी सरकारने 133 कोटी 79 लाख 89 हजार रुपये सांगली जिल्ह्यासाठी निधी मंजूर करून तो जिल्ह्याला पाठवला आहे .परंतु ,सांगली जिल्हा अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी साहेब यांनी आत्तापर्यंत पूरग्रस्तांना निधी का दिला नाही असा सवाल सर्वसामान्य जनतेमध्ये उमटू लागला आहे. 2016 पासून नोटाबंदी नंतर जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती विस्कटलेले आहे. त्यामध्येच गेल्या दोन वर्ष झालं करुणा महामारी मुळे व अनेक वेळा लॉक डाउन झाल्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे व अनेक उद्योजकांनी आपले कामगार कमी केल्यामुळे अनेक जनावर उपासमारी चे वेळ आली आहे .अशा परिस्थितीतच गेले दोन वेळा सांगली शहराला महापुरामुळे पछाडलेले आहे. महापुराच्या दरम्यान ज्यांच्या घरात पाणी शिरले व दुकानात पाणी आले . उभ्या पिकाची प्रचंड नुकसान झाल्यामुळे अशा सर्वांना सांगली जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. पूरग्रस्त भागातील अनेक लोक चातक पक्षाप्रमाणे तुटपुंजा का होईना पण निधी मिळतो याची प्रतीक्षा करत बसले आहेत .अनेक पिचलेले, गरीब, मोलमजुरी करून, हातावर पोट आहे असे कामगार वर्ग,सांगली शहरांमध्ये आहेत त्यांची परिस्थिती खूप हलाखीची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळेला पूरग्रस्त भागासाठी सांगली जिल्ह्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला आहे. परंतु हा निधी प्रत्यक्षा यांच्या घरामध्ये पाणी व दुकानांमध्ये पाणी व शेतीमध्ये पाणी गेले आहे.
त्यांचे प्रचंड नुकसान झाले अशांना मदत म्हणून महा विकास आघाडी सरकारने दिलेला निधी लोकांच्या खात्यावर ती जमा करण्यात का विलंब का होत आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जाऊ लागला आहे . सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महा विकास आघाडीचे सरकार च्या बाजूने आहात की मोदी सरकारच्या बाजूने आहात असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. पूरग्रस्तांचे आलेला निधी ट्रान्सफर करण्यासाठी काय लकवा मारला काय अशी चर्चा या जिल्ह्यातून होऊ लागले आहे असे वक्तव्य माजी प्रवक्ता संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये व्यक्त केले त्या वेळेला शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष जावेद भाई शेख, स्वप्निल शेटे, सुशांत कदम , महेंद्र माने, निखिल सकटे ,सागर बडोदेकर ,अरविंद ठोंबरे, तसेच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते चार दिवसात जर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली तर पूरग्रस्त भागातील लोकांना एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असं संतोष पाटील यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.