Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने विविध उपाययोजना हाती : आयुक्त कापडणीस यांची माहिती

महापालिका क्षेत्रातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने विविध  उपाययोजना हाती : आयुक्त कापडणीस यांची माहिती


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने सांगली आणि कुपवाड शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने विविध  उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे तिन्ही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

 याबाबत बोलताना कापडणीस म्हणाले की, 

महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक उत्तम साखळकर आणि बाधित भागातले नगरसेवक यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या उपाययोजना हाती घेण्याची मागणी केली होती. याप्रमाणे माळबंगला येथे नवीन संप आणि पंप हाऊस बनविणे व संपची क्षमता १६ लक्ष लीटर्सवरून २४.३३ लक्ष लीटर्सपर्यंत वाढविणे (याची अंदाजे किंमत २.४८ कोटी रूपये)

तसेच सांगली जॅकवेल व पाणी उपसा केंद्र पूर परिस्थितीत पाण्याखाली जाऊन या दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा बंद होऊ नये यासाठी पूर रेषेच्या वर नवीन व्हीसीबी रूम बांधणे, ट्रान्सफार्मर यार्ड  बांधणे, कॅबलिंग ब्रिज आणि ट्राय बांधणे, स्टोन पिचिंग करणे यासाठी अंदाजे किंमत २.६३ कोटी रू. खर्च अपेक्षित आहे. या बाबींचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून आगामी महासभेत या कामांना मान्यता देऊन लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे असेही आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले. याचसोबत माळबंगला जलशुध्दीकरण केंद्र येथील मोठी गळती दि. १६ ते १९ ॲाक्टोबर दरम्यान दुरूस्त करण्यात येत आहे असेही कापडणीस यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.