Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पिंपरीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; बेमुदत उपोषणाचा इशारा

 पिंपरीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; बेमुदत उपोषणाचा इशारा


पुणे :''एसटीचा शासनामध्ये विलगीकरण झालाच पाहिजे, वाढीव घरभाडे भत्ता मिळालाच पाहिजे, महागाई भत्ता मिळालंच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत पिंपरीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.'' यावेळी जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत उपोषण करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

''राज्यात दोन वर्षापासून कोरोना कालखंडात एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. आतापर्यंत एसटीच्या २८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या घरात खायला अन्न नाही अशी परिस्थिती आहे. तसेच २८ जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने त्यांना काय मदत केली आहे. आता सर्वांवर बेकार आणि विचित्र परिस्थिती येऊन बसली आहे. आमच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण करून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे.''


'महाराष्ट्रावर आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यावेळी त्यांचा तोटा लक्षात आला नाही. परंतु ज्या एसटी कर्मचाऱ्यांनाच कुठलंही आर्थिक प्रश्न उद्भवतो त्यावेळेस त्यांना एसटी तोट्यात आहे हे सदैव दिसते. आणि त्याची जाणीवही कर्मचाऱ्यांना करून दिली जाते. एसटीची सुविधा जनमाणसाला मदत करण्यासाठी आहे. त्याला व्यावसायाचे स्वरूप राजकारणी लोकांनी आणलं. राजकीय लोकांकडून निवडणूक लागल्यावर एसटीला सुविधा देण्याचा विचार केला जातो. शासनाने इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही शिक्षण, आरोग्य सुविधा, आमचे भत्ते उपलब्ध करून दिले पाहिजेत. असाही ते यावेळी म्हणाले आहेत.''


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.