Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेअर असावा तर असा...पिढ्यानपिढ्यांची संपत्ती निर्माण करणारा...या एक्क्याकडे तुमचे लक्ष आहे का?

 शेअर असावा तर असा...पिढ्यानपिढ्यांची संपत्ती निर्माण करणारा...या एक्क्याकडे तुमचे लक्ष आहे का?


मुंबई: बांधकाम, पायाभूत सुविधा ही क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची असतात. या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणारी एक गोष्ट म्हणजे सिमेंट.

शेअर बाजारात संयमाने दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्यास काय जादू होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री सिमेंट लि.  या सिमेंट उत्पादक कंपनीचा शेअर. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांची सोय होईल इतका पैसा या शेअरने गुंतवणुकदारांना कमावून दिला आहे. यावर्षी शेअर बाजाराने मागील वर्षभरात अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. काही कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षभरात दणदणीत करून दिली आहे. तर काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी दीर्घकालावधीत गुंतवणुकदारांसाठी संपत्ती निर्माण केली आहे. श्री सिमेंट ही अशीच लंबे रेसचा घोडा आहे. या कंपनीच्या शेअरने २० वर्षात गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा पैसा कमावून दिला आहे. या कंपनीने अल्पशा गुंतवणुकीने गुंतवणुकदारांच्या करोडपती बनवले आहे. शेअर बाजारातील सध्याच्या तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. मात्र ज्या गुंतवणुकदारांनी संयम राखत गुंतवणूक केली आहे त्यांना याचा खरा फायदा मिळाला आहे. सध्या श्री सिमेंट लि. चा शेअर २८,६००.०० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने छोट्या गुंतवणुकीतून करोडोंची कमाई करून दिली आहे. 

श्री सिमेंट लि.चा ७९,९०० टक्क्यांचा कल्पनेपलीकडचा परतावा

सध्या श्री सिमेंट लि.चा शेअर २८,६००.०० रुपयांच्या  पातळीवर व्यवहार करतो आहे. २० वर्षांपूर्वी म्हणजे २ नोव्हेंबर २००१ ला या शेअरची किंमत फक्त ३५.७५ रुपये प्रति शेअर इतकी होती. या २० वर्षात या शेअरने जवळपास ७९,९०० टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा देत गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.


एक लाखाच्या गुंतवणुकीचे जेव्हा होतात ८ कोटी रुपये

श्री सिमेंट लि.च्या शेअरच्या किंमत २० वर्षांच्या कालावधीत जवळपास ८०० पट वाढ झाली आहे. २० वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज ८ कोटी रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती उभी करून दिली आहे.

श्री सिमेंट लि.ची स्थापना आणि व्यवसाय

श्री सिमेंट लि.ची स्थापना १९७९ मध्ये राजस्थानातील बिवर येथे झाली होती. कंपनीचे मुख्यालय आता कोलकाता येथे आहे. सिमेंट उत्पादनाच्या क्षेत्रात ही एक आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय नॉयडा येथे आहे. मागील वर्षी कंपनीने १५४४ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले होते. कंपनीची एकूण मालमत्ता १९,९४४ कोटी रुपयांची आहे. आजच्या घडीला सिमेंटच्या क्षेत्रातील ही उत्तर भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाते.

शेअर बाजाराची दिशा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स शुक्रवारी दिवसअखेर ६७० पेक्षा जास्त अंशाची घसरण नोंदवत ५९,३०६.९३ अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी १८५ अंशांची घसरण नोंदवत १७,६७१.६५अंशांच्या पातळीवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांना आज घसरण झाली. मात्र शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

सूचना : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच सांगली दर्पणचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.