डॉल्बी सिस्टीमचा वापर करू नका, सीलबंद स्थितीत ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 08, : नवरात्रौत्सव कालावधीत सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1973 च्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144(1) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही डॉल्बी मालक / धारक नवरात्रौत्सव मंडळांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आणू नये व डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री स्वत:च्या कब्जात सीलबंद स्थितीत ठेवावी असे आदेश दिले आहेत. तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी ध्वनी प्रदूषण बाबत दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे आदेश जारी केले असून हा आदेश दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 15 ऑक्टोबर 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.