झेरॉक्स मशिन व घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता ३० ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा
सांगली, दि. ६, : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून जिल्हा परिषद स्वीय निधीमधून सन 2021-22 मध्ये मागासवर्गीयांना (पुरूष व महिला) (अ.जा., अ.ज., वि.जा.भ.ज. व नवबौध्द) झेरॉक्स मशिन घेण्यासाठी अनुदान देणे व ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य करणे या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती स्तरावर दि. ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिन योजनेतून ४० हजार रूपये अनुदान देण्यात येणार असून दिव्यांगाना घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य म्हणून १ लाख २० हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनांचे फॉर्म ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सर्व पंचायत समिती स्तरावर दि. ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील, तरी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.