भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेचा सांगली हरिपूर हेरिटेज वॉक : अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग
सांगली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडून सांगली ते हरिपूर असा हेरिटेज वॉक काढण्यात आला. या हेरिटेज वॉकमध्ये मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत सांगली ते हरिपूर अशी पदयात्रा काढली. महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा हेरिटेज वॉक काढण्यात आला.
सांगली महापालिका मुख्यालय येथे उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर , नगरसेवक विजय घाडगे यांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकला सुरवात झाली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके , आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, सावता खरात, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील, क्रीडाधिकारी महेश पाटील यांच्यासह महापालिकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सांगलीतून पायी यात्रा काढत हरिपूर येथील संगम परिसरात असणाऱ्या हुतात्मा स्मारकासमोर हेरिटेज वॉकची सांगता झाली. हरिपूरचे सरपंच विकास हनबर आणि सदस्यांनी या हेरिटेज वॉकचे स्वागत केले. तसेच हुतात्मा स्मारकाला असंणाऱ्या स्व. वसंतदादा पाटील यांच्या ऐतिहासिक उडीच्या पार्श्वभुमीची माहितीही दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांच्या सूचनेनुसार स्वच्छ सर्व्हेक्षणच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षा चव्हाण, पर्यावरण अभियंता ऋषिकेश किल्लेदार, वैष्णवी कुंभार यांनी केले. दीपक चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.