Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याच्या छोट्याशा चुकीमुळे मुख्याध्यापकांकडून तालिबानी शिक्षा

 दुसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याच्या छोट्याशा चुकीमुळे मुख्याध्यापकांकडून तालिबानी शिक्षा


मिर्जापुर, 29  : उत्तर प्रदेशातील  अहरोरामधील एका खासगी शाळेतील शिक्षकाचा क्रूर  चेहरा समोर आला आहे. येथे दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या छोटाशा चुकीमुळे शाळेचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांना राग आला. त्यांनी मुलाला बाल्कनीच्या बाहेर उटलं लटकवलं. बराच वेळ त्यांनी मुलाला त्याच स्थितीत ठेवलं. यादरम्यान कोणीतरी या दृश्याचा फोटो काढून सोशल मीडियावर  पोस्ट केला. ज्यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार अहरोरामधील सद्भावना शाळेतील आहे, येथे मुलांना तालिबानी शिक्षा देण्यात आली. या मुलाचं नाव सोनू यादव असून त्याचं वय 7 वर्षे आहे. शाळेच्या वेळेत हा मुलगा शाळेबाहेर पाणीपुरी खायला गेला होता आणि ही बाब मुख्याध्यापक मनोज विश्वकर्मा यांना आवडली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आणि फोटो जेव्हा व्हायरल झाला त्यानंतर प्रशासन आणि पोलिसात खळबळ उडाली.

डीएम यांच्या निर्देशावरुन रात्री मुलाच्या वडिलांनी मुख्याध्यापकांविरोघात गुन्हा दाखल केला.

सोनू पुरता घाबरला.. सोनूचे वडील रंजीत यादव यांनी सांगितलं की, शाळेतून परतल्यानंतर सोनू कोणासोबत काहीच बोलत नव्हता आणि सतत रडत होता. बऱ्याचदा विचारल्यानंतर त्याने घटनेबद्दल सांगितलं. यादरम्यान त्याच्यासोबत झालेल्या अत्याचाराचा व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. 

यानंतर सोनू खूप घाबरला आहे. हे ही नाशिकमध्ये शाळकरी मुलांच्या गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, CCTVमध्ये घटना या संपूर्ण प्रकरणानंतर आता मनोज विश्वकर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी जाणून-बुजून असं केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. चुकून त्यांनी बाल्कटीत त्याला उटलं पकडल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं. याबाबत त्यांनी माफीदेखील मागितली आहे. मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रार केली असून यावर कारवाई केली जात असल्याचं समोर आलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.