येथे १ कोटी ६१ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते कुदळ मारून झाला.
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) : येथे १ कोटी ६१ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते कुदळ मारून झाला. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम करणे (८६ लाख), हिंदू स्मशान भूमी शेड बांधकाम व सुधारणा करणे (५० लाख), गणेश कॉलनी ते कुरळप खडीकरण व डांबरीकरण करणे (२५ लाख), म्हासोबा मंदिरासमोर हायमास्ट बसवणे (१.५० लाख), भगलीवाडा बंदिस्त गटर करणे (१.५० लाख) या कामांचा समावेश होता. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, पंचायत समिती सदस्य सुप्रिया भोसले, सरपंच डॉ. जोत्स्ना पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती सी. वी. पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, शेतकरी संघटनेचे हणमंत पाटील, दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष रणजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विमल पाटील, मनिषा पाटील, संगीता गायकवाड, तानाजी गायकवाड, नागेश पाटील आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.