प्रभाकर साईल तक्रारीसाठी पोलीस आयुक्तालयात, वानखेडेंकडून माझ्या जीवाला धोका..
मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात काल, रविवारी किरण गोसावीचा बॉडीगार्ड आणि याप्रकरणातील पंच असलेला प्रभाकर साईलने मोठा गौप्यस्फोट केला. प्रभाकर साईलने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींचा सौदा होणार होता. मात्र १८ कोटींची डील झाली. त्यातील ८ कोटी समीर वानखेडेला आणि उरलेले पैसे इतरांमध्ये वाटून घेण्याचे किरण गोसावीचे संभाषण ऐकल्याचे प्रभाकर साईलने व्हिडिओतून सांगितले. त्यामुळे एकच खळबळ माजली. आज प्रभाकर साईल जीवाला धोका असल्याची तक्रार करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तलयात दाखल झाला असून तक्रारीद्वारे संरक्षणाची मागणी साईलने केली आहे.
प्रभाकर साईलला संरक्षण देण्याची शक्यता
आज सकाळी प्रभाकर साईल संरक्षणासाठी मुंबई पोलिसात धाव घेणार असल्याचे समोर आले होते. त्यानुसार आता प्रभाकर साईल मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाला आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला समीर वानखेडेची भीती वाटतेय. मला संरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी एनसीबीचा पंच प्रभाकर साईल मुंबई पोलीसात गेला आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे प्रभाकर साईलची तक्रार घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रभाकर साईलला संरक्षण देण्याची शक्यता आहे.
कोण आहे प्रभाकर साईल?
प्रभाकर राघोजी साईल हा ४० वर्षांचा असून किरण गोसावीकडे बॉडीगार्ड म्हणून २२ जुलै २०२१ला रुजू झाला. पण वैयक्तिक प्रोब्लेममुळे प्रभाकर साईल ३० जुलै २०२१ रोजी सर्व कपडे घेऊन कायमचा किरण गोसावीकडे ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटमधील घरी राहायला गेला. त्यानंतर प्रभाकर साईलचे राहणे, पगार सर्व काही ठरले. पण ८ सप्टेंबरला किरण गोसावीने ठाण्यातील राहत घर सोडले आणि त्यानंतर ते वाशीला शिफ्ट झाले. तेव्हापासून प्रभाकर साईल गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.