राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली
आरोग्य राज्यमंत्री मा.नामदार राजेंद्र पाटील यद्रावकर साहेब यांच्या दालनामध्ये राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे राज्य सरचिटणीस पी एन काळे यांच्या उपस्थितीत राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने 29 सप्टेंबर रोजी शासनाने प्रसिद्ध केलेली अधिसूचना त्यामध्ये बीएससी ची अट घातल्यामुळे आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, व आरोग्य पर्यवेक्षक यांना पदोन्नती, व आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
असे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी मंत्रीमहोदय यांच्या निदर्शनास आणून दिले मंत्रीमहोदय यांनी सदरची अधिसूचना आणि प्रधान सचिव यांच्याबरोबर आपण तात्काळ बैठक घेऊ असं मान्य केलं. रिक्त पदे, आरोग्य सेवक सहाय्यक आणि पर्यवेक्षक यांच्या पदोन्नत्या ,वेतन एक तारखेला झालं पाहिजे, कोरोना मुळे मृत पावलेल्या हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा कवच व अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या वारसांना तात्काळ नोकरी मिळावी. यासाठी राज्याध्यक्ष यांनी आग्रह धरला आरोग्य सेवक आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक यांचे नामकरण व्हावे, यांनी आरोग्य पर्यवेक्षक याचा नामकरण, बंधपत्रित कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्काळ नियमित करा आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मध्ये हिवताप विभागाकडील एक आरोग्य सहाय्यक व एक आरोग्य सेवक नियुक्त करावेत, अंतर मंडळ बदल्या तात्काळ करण्यात याव्यात.
नांदेड येथील क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती तात्काळ कराव्यात अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली .यावेळी विविध जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष नितीन कांबळे सुधीर खाडे ज्येष्ठ परिवेक्षक ,दिनकर थोरात, संतोष भोइर ,पराग मांडे , सोलापूरचे अनिल येलमार, समीर हुडीवाले, श्री काझी, अभिजित कुलकर्णी, वसंत गायकवाड, शरद निकम, रामकृष्ण पवार इत्यादी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.