सांगली श्री गणपती मंदिरासमोर भाजप अध्यात्मिक आघाडी तर्फे आरती करून व साखर वाटप व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा
सांगली ७ ऑक्टोबर :- घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या मुहूर्तावर राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील गेली आठ महिने कोरोना महामारीच्या काळात बंद ठेवण्यात आलेली मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे आज उघडण्यात आली, कोरोना महामारी आटोक्यात येऊन देखील अनेक दिवस जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने विलंब केला होता. पण भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीने अनेकदा ही देवस्थाने मंदिरे उघडण्यासाठी मंदिरा समोर आंदोलन व घंटानाद आंदोलन केली होती व महाराष्ट्र सरकारला व राज्यपालांना वारंवार निवेदन दिली.. त्यामुळे उशीर का होईना. मंदिर उघडण्याची सुबुद्धी राज्य शासनास सुचली.
त्यामुळे आज सांगलीतील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरा समोर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी श्री गणेशाची आरती करून भक्तांचे स्वागत साखर वाटून केले. यावेळी सर्व भाजपाच्या पदाधिकारी यांनी साखर वाटप व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी माजी आमदार नितीनराजे शिंदे, अध्यात्मिक आघाडीचे अजयकुमार वाले, नगरसेवक युवराज बावडेकर, श्रीकांतदादा शिंदे, अविनाश मोहिते,विजयदादा कडणे, बाळासाहेब बेलवलकर, मोहन जामदर, महिला मोर्चाच्या वैशालीताई पाटील, प्रियानंद कांबळे तसेच आदि मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.