मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांच्या मासिक वेतनाबाबत माहिती आली
मुंबई: महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसूलीचे आरोप केलेलं पत्र लिहून लेटर बाॅम्ब फोडणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे सध्या कुठे आहेत याबाबत कुणालाही काही माहिती नाही. तसेच त्यांची मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी करत त्यांची बदली करण्यात आली.
मुंबई पोलिस आयुक्तपदावरून त्यांची बदली महाराष्ट्र होम गार्ड विभागात करण्यात आली. पण त्यांनी तेथिल पदभार स्विकारण्याआधीच सुट्टी घेतली व त्यानंतर ते पदावर रुजू झालेच नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले. खंडणी आणि बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले.
परमबीर सिंहांवर आरोप झाल्यानंतर तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना वारंवार चौकशीसाठी बोलवण्यात आलं. पण ते नेमके कुठे आहेत याबाबत कुणालाही काही माहिती नाही. त्यामुळे आता त्यांच्या मासिक वेतनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने त्यांचं मासिक वेतन रोखलं आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर ते नेमकं कुठे गेले आणि आता का समोर येत नाहीत, असा प्रश्न विचारला जात असतानाच गृहविभागाने त्यांचं मासिक वेतन रोखुन धरलं आहे. या प्रकरणात आता पुढे नेमकं काय होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.