Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दक्षिण भारत जैन सभेच्या १०० व्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रमुख अतिथी

 दक्षिण भारत जैन सभेच्या १०० व्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रमुख अतिथी



आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन दिले निमंत्रण 


मुंबई: दक्षिण भारत जैन सभेचे शंभरावे त्रैवार्षिक अधिवेशन जानेवारी 2022 मध्ये सांगली येथे होत आहे, दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बोरगांव येथे झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला होता, याच बैठकीत या अधिवेशनाच्या स्वागत अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवड झाल्याची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगांवकर यांनी केली होती, या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निमंत्रित करण्याचे निश्चित झाले होते, याचाच भाग म्हणून मंगळवारी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहावे अशी विनंती केली आणि या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले, या वेळी दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, डॉक्टर अण्णासाहेब चोपडे आणि राजेंद्र झेले, आदी मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.