नाव बदललं, आता जग अन् जगणं बदलायचंय; समजून घ्या 'फेसबुक'चं 'मेटा' करण्यामागचा 'मेगा' प्लॅन
जगातील सर्वात मोठी सोशल मीडियावर अग्रेसर असणाऱ्या फेसबुकने आपले नाव बदलले आहे. आता जगभरात फेसबुक मेटा नावाने ओळखले जाणार आहे. गुरुवारी फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे.
अनेक दिवसांपासून नाव बदलण्याची चर्चा सुरु आहे. अखेर नाव बदलण्याची प्रक्रिया संपली आहे. फेसबुकला 'META' (Facebook-META) असे नाव दिले आहे.
सध्या फेसबुक (Facebook) या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या उप कंपन्या आहेत.
यामध्ये खास करुन फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.
हे नामकरण करताना सध्या असणाऱ्या सेवा आणि अॅपची नावं बदलली जाणार नाहीत असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, फक्त नावच नाही तर कंपनीने आपला लोगोही बदलला आहे. आता फेसबुकच्या एफऐवजी इन्फीन्टीचं चिन्हं हे कंपनीचा लोगो असणार आहे.
या चिन्हामधून आणि नवामधून फेसबुकने (Facebook) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि त्यावरील संशोधन आता याच ब्रॅण्डनेमखाली केलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
फेसबुकच्या या घोषणेमुळे ओरिजनल अॅप आणि सर्विस जी सुरू आहेत, ती सुरू राहतील आणि यात काही बदल होणार नाही.
या कंपनीची री-ब्रँडिंग आहे आणि कंपनीचे बाकी प्रॉडक्ससारखे व्हॉट्सअॅप आणि इन्स्टांग्रामला कंपनीच्या नव्या लेबलअंतर्गत आणण्याची योजना आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.