Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली यांच्या वतीने मोफत लसीकरण.

 खिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली यांच्या वतीने मोफत लसीकरण.


सांगली 2 ऑक्टोबर 21:-
अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समिती सांगली यांच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पीपीसीआर, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, बामणोली, सांगली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, सांगली या संस्थांच्यावतीने शनिवार दि.2 ऑक्टोबर 2021 रोजी मोफत कोव्हीड लसीकरण मोहिमेचे आयोजन (पहिला आणि दुसरा डोस) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत विष्णुदास भावे नाट्य मंदिर, सांगली इथं आयोजित करण्यात आले. 


आमदार मा. सुथीरदादा गाडगीळ, श्री.विलास चौथाई (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, सांगली जिल्हा संघचालक) डॉ. दयानंद नाईक, श्रीनिवास जरंडीकर (नियामक मंडळ मुंबई सदस्य), नाट्य परिषद शाखा सांगली अध्यक्ष मुकुंद पटवर्धन, उपाध्यक्षा सौ अंजली भिडे, सहकार्यवाह विशाल कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर, बाळासाहेब गायकवाड,  सौ. शर्मिला पाठक,  सौ. मेधा केळकर, विवेक देशपांडे यांच्या उपस्थितीत नटराज पुजन करुन मोफत लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास भालचंद्र चितळे, रविंद्र कुलकर्णी, हरिहर म्हैसकर, जगदीश कराळे,  विलास गुप्ते, अरुण दांडेकर, महेश कराडकर, उपस्थित होते. लसीकरण केंद्रास नगरसेविका सौ. स्वातीताई शिंदे यांनी भेट दिली. सांगलीतील कलाकार आणि रसिकांसाठी नाट्य परिषद सांगली शाखेने मोफत लसीकरणाचे आयोजन केले. यात १०० जणांनी लसीकरण केले अशी माहिती शाखेचे प्रमुख कार्यवाह सनित कुलकर्णी यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.