घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ..
सणासुदीचा काळ सुरु असतानाच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरगुती गॅस सिलिंडर न्हा एकदा महागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आधीच वाढत्या भाजीपाल्याच्या दरांमुळे पिचलेल्या जनतेचा खिसा आणखी खाली होणार आहे.
तेल कंपन्यांनी 6 ऑक्टोबरपासून बिना सबसिडीवाल्या घरगुती वापराच्या 14.2 किलोग्राम सिलिंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे राजधानी दिल्ली आणि मुंबईतील गॅस सिलिंडरची किंमत 884.50 रुपयांवरून 899.50 रुपये झाली आहे. याआधी महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी 19 किलोग्रामच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये 43.50 रुपये वाढ केली होती. त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
प्रमुख शहरातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती (14.2 किलोग्राम)
दिल्ली - 899.50
मुंबई - 899.50
कोलकाता - 926
चेन्नई - 915.50
प्रमुख शहरातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती (19 किलोग्राम)
दिल्ली - 1736.50
मुंबई - 1685
कोलकाता - 1805.50
चेन्नई - 1867.50
नॅचरल गॅसच्या किंमतींमध्ये वाढ
याआधी सरकारने नॅचरल गॅसच्या किंमती 62 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने यात वाढ करण्यात आली होती. नॅचरल गॅसच्या किंमती वाढल्याने सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅसच्या किंमतीही वाढल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.