Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपला लोकप्रिय करण्यात कै. प्रमोद महाजन यांचा मोठा वाटा : आमदार सुधीरदादा गाडगीळ

 भाजपला लोकप्रिय करण्यात कै. प्रमोद महाजन यांचा मोठा वाटा : आमदार सुधीरदादा गाडगीळ



सांगली ३० ऑक्टोंबर : “भाजपच्या पारंपारिक कार्यपद्धतीत बदल करून भाजपला जनतेत महत्वाचे स्थान मिळवून देण्यात कै. महाजनांची धोरणे यशस्वी ठरली. शेतकरी – शेतमजूर, कामगार आणि विशेषत: तरुणांना भाजपा हा आपला पक्ष आहे. आणि हाच पक्ष आपल्या समस्या सोडवू शकतो, असा विश्वास कै. महाजनांनी निर्माण केला. भाजपच्या सर्वव्यापी विकासात कै. महाजनांचे योगदान महत्वाचे आहे.” असे विचार आमदार सुधीरदादा  गाडगीळ यांनी  संपर्क कार्यालयात झालेल्या कै. प्रमोद महाजनांच्या जयंती कार्यक्रमात आपले विचार मांडले.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, भाजपचे प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, चेतन सूर्यवंशी, गौस पठाण, गणपती साळुंखे आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.