या आठवड्यात दोन आयपीओ ओपन होणार
त्यामुळे तुम्ही देखील या नवीन IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर याबद्दल तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे जाणून घ्या. Nykaa चा IPO Nykaa या ब्युटी आणि वेलनेस प्रोडक्ट्सची ऑनलाईन विक्री करणाऱ्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सचा IPO या महिन्यात 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान ओपन होईल. कंपनीने यासाठी 1085-1125 रुपयांचा प्राईज बँड निश्चित केला आहे. यामध्ये 630 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील आणि प्रमोट आणि सध्याचे शेअर होल्डर्स चार कोटींपेक्षा जास्त शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) असेल.
कंपनीला या महिन्याच्या सुरुवातीला सेबीकडून IPO साठी परवानगी मिळाली. नवीन रिटेल स्टोअर्स आणि वेअरहाऊस उघडण्याव्यतिरिक्त IPO मधील निधीचा वापर कर्ज कमी करण्यासाठी केला जाईल. Radhakishan Damani यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला कंपनीचे देशभरात 68 स्टोअर्स Nykaa ची स्थापना 2012 मध्ये फाल्गुनी नायर या माजी इनवेस्टमेंट बँकरने केली होती. कंपनी सौंदर्य उत्पादने विकते.
ऑनलाईन विक्री व्यतिरिक्त, कंपनी किरकोळ दुकानांद्वारे देखील विक्री करते. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये TGP आणि Fidelity सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. Nykaa च्या पोर्टफोलिओमध्ये 15,000 हून अधिक ब्रँडचा समावेश आहे. यात obbi Brown,LOccitane आणि Estee Lauder सारखी मोठी नावे आहेत.कंपनीची देशभरात 68 स्टोअर्स आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचे उत्पन्न 1,860 कोटी रुपये आहे. Fino Payments Bank ltd चा आयपीओ Fino Payments Bank Ltd चा IPO 29 ऑक्टोबर रोजी ओपन होईल आणि 2 नोव्हेंबर रोजी बंद होईल. या IPO मध्ये 300 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असेल.
यासोबतच फिनो पेमेंट ऑफर फॉर सेलमध्ये 1.56 कोटी शेअर्स विकणार आहे. या स्टॉकची लिस्टिंग 12 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजवर होईल. फिनो पेमेंट बँकेत Blackstone, ICICI Group, Bharat Petroleum आणि IFC सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे. 25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट Axis Capital, CLSA Capital, ICICI Securities and Nomura Financial advisory and Securities हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
या आयपीओच्या फ्रेश इश्यूमधून मिळणारी रक्कम कंपनीच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीचा टियर 1 कॅपिटल बेस वाढवण्यासाठी वापरली जाईल. कंपनीचे टियर 1 भांडवल प्रमाण FY21 मध्ये 56.25 टक्के होते. फिनो पेमेंट बँक ही एक फिनटेक कंपनी आहे जी विविध प्रकारचे फायनान्शिअल प्रोडक्ट्स उपलब्ध करते. कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने डिजिटल आणि पेमेंट आधारित सेवांवर केंद्रित आहे. मार्च 2021 पर्यंत या प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे 43.49 कोटी ट्रान्झॅक्शन झाले. या सर्व व्यवहारांची एकूण किंमत 1.33 लाख कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 791.03 कोटी रुपये होते. जे गेल्या वर्षी 691.40 कोटी रुपये होते. या कालावधीत कंपनीचा नफा 20.47 कोटी रुपये होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.