Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चिंचणी यांनी येथील बेकायदेशीर सावकार विकास सूर्यवंशी व अविनाश सुर्यवंशी रा. तडसर रोड चिचणी वांगी यांना सांगली पोलीसांकडून जेरबंद

चिंचणी यांनी येथील बेकायदेशीर सावकार विकास सूर्यवंशी व अविनाश सुर्यवंशी रा. तडसर रोड चिचणी वांगी  यांना सांगली पोलीसांकडून जेरबंद



चिचणी वांगी येथील विकास सहदेव सुर्यवंशी व अविनाश उर्फ आनंदा आप्पासो सूर्यवंशी दोघे रा. तडसर रोड चिंचणी यांगी हे बेकायदेशीर सावकारी करीत असुन त्याने माळवणी चिंचणी यांगी कराड वगैरे भागातील कर्जदार यांना मासिक ८ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करून संबंधीत कर्जदार यांचेकडुन कोरे चेक, कोरे स्टॅप, घेवून त्यांचेकडून दरमहा व्याज घेणे तसेच व्याज वेळेत न दिल्यास प्रतिदिन ५०० रु दंड आकारणी करून अमानुष पध्दतीने कर्जदार यांना वागणुक देवून कर्जदारांना सळो की पळो केलेले होते याप्रकरणी पिडीत योगिता मधुकर यादव रा. भाळवणी हिने काल दि. २७.१०.२०२१ रोजी मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांना समक्ष भेटुन आपली व्यथा मांडली सावकारांच्या जाचहाटास कंटाळून आपला नवरा मधुकर नेहरू यादवः हा दि. २५.१०.२०२१ रोजी पासून कोणास काहीएक न सांगता सावकारांच्या धमकी पोटी कोठेतरी निघून गेलेबाबत व याप्रकरणामध्ये आपण रुपये २ लाख कर्ज सावकारांकडुन कर्ज घेतले होते त्या मोबादल्यात रुपये १ लाख २८ हजार परत केले नंतर देखील पुन्हा २ लाख ३८ हजार रुपये मागणी करुन ते महिना अखेर पर्यंत परत करावेत. अन्यथा दिलेल्या कोरे चेकच्या आधारे देय रक्कमेपेक्षा दुप्पट रक्कम वसुलीसाठी कोर्टात चेक चॉउन्सची केस घालणार असल्याची धमकी दिल्याने आपला नवरा कोठेतरी निघुन गेला आहे अशा प्रकारची तक्रार दिली आहे.

मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी वरील तक्राराची दखल घेवून याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयातील सावकारी सेल व पो.नि स्थागुअ शाखेकडील पथक यांना आदेश देवून याप्रकरणी संबंधीत सावकार यांचेवर ठोस कारवाईचे आदेश दिले त्याप्रमाणे सावकारी सेल कडील पोलीस उपनिरीक्षक आर एफ मिरजे, पोना/गणेश चव्हाण, पोकॉ संदीप पाटील स्थागुअ शाखेकडील सपोफो अच्युत सुर्यवंशी, पोह सुधीर गोरे, पोना इम्रान मुल्ला, पोना/अनिल कोळेकर, मपोना/स्नेहल पाटील या पथकाने याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपीना ताब्यात घेवून त्याच्या घराची झडती घेतलेनंतर किंमत रुपये ३२०००/- चा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणामध्ये आरोपी विकास सुर्यवंशी यांचे राहते घरात १५ स्वाक्षरी असलेले कोरे चेक व १५ स्वाक्षरी असलेले १०० रु कोरे बॉण्ड याशिवाय सावकारीतून कर्ज दिलेल्या व व्याज घेतलेल्या नोंदीची दोन रजिस्टरे जप्त करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये फिर्यादीचे पतीचे देखील चेक व बॉण्ड मिळुन आलेले आहेत.

उपरोक्त सावकारांनी भाळवणी, चिंचणी वांगी, अंबक, कराड, वगैरे भागातील सुमारे १०० ते १५० कर्जदारांना बेकायदेशीर सावकारीतून कर्ज पुरविले आहेत. मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी उपरोक्त प्रकरणी पिडीत कर्जदार यांनी पुढे येवन चिंचणी वांगी पोलीस ठाणे येथे संबंधीत सावकाराविरुध्द आपल्या तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय सांगली जिल्हयातील नागरिकांनी अशा तक्रारीबाबत समक्ष आपल्या व्यथा मांडणेबाबत देखील आवाहन केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.