जिल्ह्यात ७१ हजार ४३८ बाधीत कुटूंबांना ७१ कोटी ४३ लाख ८० हजार इतके अनुदान लाभार्थ्यांवच्यां बॅंक खात्यावर वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली दि. ०4 : माहे जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामध्ये् सांगली जिल्ह्यातील मिरज, पलुस, वाळवा, शिराळा या तालुक्यातील जी कुटुंबे बाधीत झाली आहेत त्याा प्रत्येाक कुटुंबाला र.रू.१० हजार प्रमाणे मदत देणेत येत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ७१ हजार ४३८ बाधीत कुटूंबांना र रु ७१ कोटी ४३ लाख ८० हजार इतके अनुदान लाभार्थ्यांीचे बॅंक खातेवर वितरीत करणेत आले आहे. तसेच सानुग्रह अनुदानाची उर्वरित बाधीत कुटूंबांचे अनुदान वाटप प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
पहिल्याच टप्यायांनतील व दुस-या टप्प्यातील अनुदान वाटप झालेल्या कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र – ३० हजार ४९५, मिरज ग्रामीण क्षेत्र – १ हजार २०२, अपर सांगली ग्रामीण क्षेत्र – ९ हजार ९८८, तालूका वाळवा – ९ हजार ९०६, अपर आष्टा – ३ हजार ५२२, तालूका शिराळा – १ हजार ६५३, तालूका पलूस – १४ हजार ६७२ असे एकूण ७१ हजार ४३८ बाधीत कुटूंबांना र रु ७१ कोटी ४३ लाख ८० हजार इतके अनुदान लाभार्थ्यांेचे बॅंक खातेवर वितरीत करणेत आले आहे.
मयत पशुधन अनुदान वाटप पुढीलप्रमाणे अपर सांगली – २ लाभार्थ्यांना 74 हजार रुपये अनुदान वाटप, वाळवा तालूका ३६ लाभार्थ्यांना रुपये ७ लाख ९४ हजार, अपर तहसिलदार आष्टापमध्ये १० लाभार्थ्यांना रुपये रु ३ लाख ०७ हजार, शिराळा तालुका ८ लाभार्थ्यांना रुपये २ लाख ४५ हजार, पलूस तालुक्यात २१ लाभार्थ्यांना रुपये रु ४ लाख ९० हजार असे एकूण ७७ लाभार्थ्यांरचे र रु १९.१० लाख अनुदान वाटप झाले आहे. तालूका मिरज मध्येय अनुदान वाटप प्रक्रिया सरु आहे.
शेतजमिनीचे नुकसान अनुदान वाटप पुढीलप्रमाणे अपर तहसिलदार सांगली मध्ये रु १७ लाख ७६ हजार, वाळवा तालुक्यामध्ये रु ३० लाख ५६८ रुपये, शिराळा तालुक्यामध्ये रु १ कोटी ८३ लाख २५ हजर ८00 रुपये,पलूस तालुक्यामध्ये रु ४ लाख ३९ हजार ९00 रुपये असे एकूण र रु २ कोटी ३५ लाख ९८ हजार ३00 लाख अनुदान वाटप झाले आहे.
घरपडझड, झोपडया, गोठे इ.नुकसानीचे अनुदान वाटप पुढीलप्रमाणे मनपा क्षेत्र ३३ लाख ८५ हजार, . मिरज ग्रामीण १२ लाख ३० हजार, अपर सांगली रु ९० लाख ९७ हजार १00 रुपये, वाळवा तालुक्यामध्ये रु २ कोटी १८ लाख ९३ हजार ४00 रुपये, शिराळा तालुक्यात १ कोटी ४३ लाख २७ हजार ९00 ६. पलूस तालूका रु ५ कोटी १३ लाख ३५ हजार असे एकूण र रु १० कोटी १३ लाख ५६ हजार ६00 अनुदान वाटप झाले आहे. तसेच उर्वरित घरपडझड, गोठे, झोपडया तसेच बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुाटपालन शेड, इत्याादीचे अनुदान वाटप प्रक्रिया सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.