पोलीस दल भरती प्रक्रियेसाठी वाहनांसाठी मनाई आदेश जारी
सांगली दि. ०२ : सांगली जिल्हा पोलीस दल भरती प्रक्रिया दि. 3 व 4 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू होणार आहे. या प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातून उमेदवार येणार आहेत. याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये सांगली शहरातील खालील मार्गावर पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना सांगली शहरामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजीपासून व 4 ऑक्टोबर 2021 रोजी भरती प्रकिया संपेपर्यंत सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
मनाई आदेश लागू करण्यात आलेला रस्ता व ठिकाणे पुढीलप्रमाणे. हॉटेल चाणक्य चौक ते हनुमान मंदीर (भारत सुतगिरणी चौक ते कृपामाईचे पूर्वेकडील मारूती मंदीर) नविन बायपास रस्ता व सदर मार्गावरील जोडणारे सर्व जोडरस्ते.
पर्यायी वाहतूक व्यवस्था पुढीलप्रमाणे. मिरजेकडून येणाऱ्या वाहनांसाठी - नविन बायपास रोडकडे भारत सुतगिरणी चौकाकडे न जाता मिरज सांगली रोडने सांगलीकडे विश्रामबाग चौक मार्गे कुपवाड रोड, साखर कारखाना रोडकडे जाता येईल. माधवनगर व सांगली शहरातून येणाऱ्या वाहनांसाठी – भारत सुतगिरणी चौकातून नविन बायपास रोडकडे न जाता कुपवाड – एम.आय.डी.सी.मार्गे मिरज शहराकडे जाता येईल.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.