Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खराडे आण्णांनी शुन्यातून विश्वनिर्माण केले - प.पू. झेंडे महाराज

खराडे आण्णांनी शुन्यातून विश्वनिर्माण केले - प.पू. झेंडे महाराज



आजची परिस्थीती वेगळी मात्र बिकट परिस्थितीतही खराडे कुटुंबियांचा पत्रकारितेत डंका - विशाल पाटील ज्येष्ठ पत्रकार बापूराव खराडे यांच्या 'पत्रकारितेतील झंझावात' या पुस्तकाचे प्रकाशन


सांगली, दि. २८: ज्येष्ठ पत्रकार बापूराव खराडे यांनी शुन्यातून विश्वनिर्माण केले असून अनेक हल्ले आणि बिकट परिस्थितीतही आपले वृत्तपत्र नेटाने चालवून त्याची प्रगती केली आहे. आपण त्याचे पहिल्या दिवसापासून साक्षिदार आहोत, असे मत परमपूज्य झेंडे महाराज यांनी व्यक्त केले. पत्रकारितेतील झंझावात प्रकाशनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी सांगलीचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सांगलीचे आमदार सुधिरादा गाडगीळ, माजी आमदार प्रा. शरद पाटील, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, मराठा समाजाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प.पू. झेंडे महाराज म्हणाले की, आपण १५ वर्षाचे असल्यापासून आपला आणि खराडे कुटूंबीयांचा संबंध आहे. बापूसाहेब खराडेंचे आई वडिल हे फार दानशूर होते. तसेच बापूसाहेब खराडे यांनीही सर्व बंधूंना बरोबर घेऊन त्यांचा विकास केला. प्रत्येक घरात वाद असतो पण हा वाद जाहिर रित्या न करता खराडे यांनी सर्वांना बरोबर घेऊन आपली प्रगती केली.

खराडे यांना आम्ही मामा म्हणतो त्यांच्यावर अनेक हल्ले झाले त्याचाही मी साक्षिदार आहे. मात्र खराडे यांनी न डगमगता वृत्तपत्र व्यवसाय सुरूच ठेवला आणि तो वाढविला ही. या वृत्तपात्राचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून त्यांचे चिरंजीव सुभाष खराडे तसेच सुभाषचे चिरंजीव ऋषिकेश अशी तीन पिढ्यांमध्ये ललकारची घोडदौड सुरू आहे. खराडे मामांच्या मोतोश्री या जिजामाता होत्या असा गौरोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी बोलताना युवा नेते विशाल पाटील म्हणाले की, आजच्या पत्रकारीतेची परिस्थिती वेगळी आहे. आज गल्लोगल्ली युटूबची पत्रकारीता वाढली आहे. मात्र खराडे आण्णा ज्या काळात पत्रकारीता करीत होते तो काळ फार बिकट होता. त्या काळात अनेक हल्ले परतवून लाऊन त्यांनी जी पत्रकारीता केली आहे ती वाखान्याजोगी आहे. केवळ पत्रकारीता न करताना आपले वृत्तपत्र वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना त्यांचे चिरंजीव सुभाष खराडे यांचीही साथ मिळाली. आज तिसऱ्या पिढीत ऋषिकेश खराडे हेही पत्रकारीतेत आघाडीवर आहेत. आमच्या दादा घराण्याच्या तीन पिढ्यांशी खराडे कुटूंबीयांचा व ललकार परिवाराचा संबंध आहे. खराडे आण्णांनी दादांच्या बरोबर काम केले आहे. ललकारच्या भावी वाटचालीला त्यांना शुभेच्छा दिल्या. 

सांगलीचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी शुभेच्छा देताना ज्येष्ठ पत्रकार खराडे आणि आमचे आजोबा भगवानराव सुर्यवंशी यांचे जवळचे संबंध होते. आपण लहानपणापासून ललकारची प्रगती पाहिली असून गल्लोगल्ली सायंकाळी ओडून विकला जाणारा ललकार आज वाचकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे, असे गौरवउद्गार त्यांनी काढले.

यावेळी बोलताना जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे म्हणाल्या की, आपल्या सर्वांचे रक्त तपासले तर रक्तात वेगवेगळे घटक मिळतील मात्र ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब खराडे यांचे रक्त तपासले तर त्यात केवळ पत्रकारितेचेच रक्त मिळेल कारण त्यांचा संघर्ष जबरदस्त आहे. त्यांच्यावर झालेले अनन्य हल्ल्यांला भिक न घालता ताठ मानेने पत्रकारिता करून गेली ७५ वर्षे आपला ठसा कायम ठेवला आहे.

यावेळी बोलताना पद्मश्री विजयकुमार शाह म्हणाले की, ‘बापू' नावाच्या लोकांचा आपल्यावर मोठा आशिर्वाद आहे. बापूराव खराडे यांनी आपल्याला त्यावेळी सकारात्मक प्रसिद्धी दिल्याने आपल्याला गल्लीपासून दिल्लीच्या राष्ट्रपती भवानापर्यंत पोहचता आले, असे मत त्यांनी वक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी यांनी खराडे यांच्याबरोबर केलेल्या पत्रकारीतीची अनेक दाखले दिले. त्याकाळात खराडे यांनी परिस्थिती फार बिकट होती. त्याकाळापासून आपण त्यांच्याबरोबर आहोत, असे सांगून त्यांनी नव्य पत्रकारांना मार्गदर्शन केले.

यावेळी महेश कराडकर यांनी आपली पहिल्यापासून खराडे आण्णांशी ओळख आहे. मात्र लग्नानंतर आपल्याला दुसरा सासरा मिळाला. कारण आमचे सासरे स्वातंत्र सैनिक दिनकर मुद्राळे हे आण्णांचे गुरू होते, असे गौरोउद्गार काढले.

सुरूवातीला दै. ललकारचे संपादक सुभाष खराडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर शेवटी दै.ललकारचे कार्यकारी संपादक ऋषिकेश खराडे यांनी सर्वांचे आभार मानले.

या प्रकाशन सोहळ्याला खराडे आण्णा यांचे बंधू संपतराव खराडे आणि शाहीर खराडे, माजी नगरसेवक हणमंत पवार, अजित सुर्यवंशी, विकास मोहिते, ए.डी. पाटील, सुधिर सावंत, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने, मिलींद बांदिवडेकर, माहिती सहाय्यक रणजित पवार, विजयकुमार दिवाण, राजेंद्र पोळ, हेमंत पाटील, तसेच नातेवाईक प्रकाश सुर्यवंशी, गणपतराव यादव, बाबासाहेब यादव, प्रकाश क्षीरसागर, निशीकांत यादव, प्रविण क्षीरसागर, रामचंद्र मोहिते (कुरूंदवाड), राजाराम घाडगे (मिरज), संजय सुर्यवंशी (तासगांव), विजय साळुंखे, अमोल झांबरे, पत्रकार हरिष यमगर, प्रकाश कांबळे, मंगेश मंत्री, विकास गोंधळे, मारूती नवलाई, विकास सुर्यवंशी, तानाजी जाधव, चंद्रकांत गायकवाड, ॲअॅड. विक्रांत वडेर, अरूण रामतिर्थकर, संजय गायकवाड, विलास चव्हाण, चंद्रकांत धामणीकर, अशोक जाधव, संपत बर्गे, आप्पा पाटणकर, रंगराव हुद्दार, रमेश सरडे, प्रशांत साळुंखे, नामदेव भोसले, राजू जाधव (विटा), अजित महाजन (शिराळा), प्रविण चौगुले, महेश मालेकर, निमेश कारंडे, सुकुमार पाटील, दीपक ढवळे, अमोल मदव्वाण्णा, अविनाश दिक्षीत, प्रकाश मोहिते, सलमान अमीन, आनंदा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.