आयुक्त नितीन कापडणीस यांनी भ्रष्टाचार केला त्याचा हा पुरावा घ्या संतोष कदम
शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख श्री संजय बापू विभूते, उपजिल्हाप्रमुख श्री शंभूराजे काटकर, शहर प्रमुख श्री मयूर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब तसेच उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री श्री उदयजी सामंत साहेब, व शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख श्री नितीनजी बानूगडे पाटील साहेब यांना समक्ष भेटून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये आयुक्त नितीन कापडणीस यांची वर्णी लागल्यापासून जो भ्रष्टाचार झाला आहे व एक लोकसेवक असून ही हुकूमशाही पद्धतीने जे काम चालू या विरोधात कागदोपत्रे पुरव्यासहीत आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रधान सचिव किंव्हा एक उच्च स्तरीय समिती नेमून त्यांच्या कारकीर्द मध्ये झालेल्या भ्रष्टाचार ची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांचे निलंबन करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन दिले आहे.
मी त्यांना आयुक्त नितीन कापडणीस हे गैरकारभार व भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी जाणीवपूर्वक पाठीशी घालत असलेचे कागदोपत्री पुरावे असलेचे सांगितले. मा. श्री एकनाथ शिंदे साहेब व श्री उदय जी सामंत साहेब यांनी गैरकारभार व भ्रष्टाचारास आयुक्तांनी पाठीशी घातले असेल किंव्हा स्वतः काही भ्रष्टाचार केला असेल 100% कायदेशीर कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे.
जो पर्यंत भ्रष्टाचारी कर्मचारी व अधिकारी यांचेवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या आयुक्तावर कारवाई होत नाही तो पर्यंत पाठपुरावा चालू राहील.
संतोष विष्णू कदम सांगली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.