धनंजय मुंडेंचं मोठं विधान; या कायद्याप्रमाणे वानखेडेंची चौकशी होणार.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले लाचखोरी आणि खोटे कागदपत्रे सादर करून मिळवलेली नोकरी.
या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे आणि आरोप केले.
समीर वानखेडेंवर खंडणी आणि खोटे कागदपत्रे सादर करण्याच्या आरोपांच्या प्रकरणात आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. समीर वानखेडेंच्या कागदपत्रासंदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल, असं म्हणत अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नवाब मलिकांनी ट्विटर आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून समीर वानखेडेंवर आरोप करत मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली गेले काही दिवस हे प्रकरण चांगलंच गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावरून राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. त्यातच अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जातपडताळणी कायद्याप्रमाणे चौकशी केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यातच आता नवाब मलिक या संदर्भात तक्रार दाखल करणार का?, तसेच या प्रकरणी आणखी काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.