Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे 'माफिया' म्हणून काम करतात.

किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे 'माफिया' म्हणून काम करतात.


मुंबई : मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ आणि मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या सर्वांच्या नंतर आता सोमय्या यांनी आपला मोर्चा पोलीस दलाकडे वळवला आहे. पोलीस दलात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांच्यावर किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केला आहे.

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करतात, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी मला बेकायदेशीरित्या घरात कोंडून ठेवलं, तिथल्या पोलिसांना ते सूचना देत होते. याबाबत, राष्ट्रीय मानवाधिकार यांच्याकडे आपण तक्रार केल्याचेही सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, नांगरे पाटील हे सध्या मुंबईचे सहपोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यासंदर्भातच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय ग्रामविकासमंत्र्यांची भेट घेतली. तसेच, इन्कम टॅक्स विभाग, ईडी यांसह इतरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार, आता गतीने तपास सुरू असल्याचे सोमय्यांनी म्हटले.


परिवहन मंत्री अनिल परब यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्यांना समन्स बजावले. सोमय्या यांनी २३ डिसेंबर रोजी या दाव्यावरील सुनावणीस स्वतः हजर राहावे किंवा वकिलांना हजर करावे, असे न्यायालयाने नमूद केले आहे. सोमय्या हेतुपूर्वक बदनामी करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.