घरातील फर्निचरसुद्धा ठरु शकतं वास्तू दोषाचे कारण..
मुंबई : तुमच्या घरातील फर्निचरसुद्धा तुमच्या आयुष्यासोबत संबध असतो. त्यामुळे घरात फर्निचर घेताना ते कोणत्या रंगाचे आहे, त्याचा आकार कोणता या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे असते.घरामध्ये असणाऱ्या गोष्टी फर्निचर वास्तूच्या नियमांप्रमाणे तुम्ही ठेवलेत तर त्याच्य परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. तुम्हाला आयुष्यात यश आणि समृद्धी हवी असेल तर वास्तूच्या नियमांप्रमाणे घरातील फर्निचर योग्य ठिकाणी ठेवा. घरातील फर्निचर त्याचा रंग या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तू शास्त्रात संगितलेल्या 8 गोष्टी
* वास्तू शास्त्रानुसार फर्निचर विकत घेताना त्याचे कोपरे टोकदार असू नये. वास्तू शास्त्रानुसार गोल कोपऱ्यांचे फर्निचर शुभ मानले जाते. टोकदार कोपऱ्यांच्या फर्निचरमुळे ईजा होण्याची शक्याता जास्त असते. त्याप्रमाणे घरामध्ये कलह देखील वाढू शकतो.
* आज काल बाजरामध्ये अनेक प्रकारचे फर्निचर उपलब्ध असतात. पण वास्तूशास्त्रानुसार लाकडी फर्निचर सर्वात शुभ मानले जाते.
* लोखंड किंवा लाकडाचे फर्निचर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. ज्या करणामुळे घरामध्ये कलह निर्माण होतो.
* घरामध्ये पिंपळ, चंदन, किंवा वडाच्या झाडापासून तयार झालेले फर्निचर वापरु नये. या झाडांची पूजा केली जाते. त्यांना कापणे अशुभ मानले जाते.
* घरामध्ये कडुनिंब, साल, अशोक, अर्जुन, साग आणि साल या झाडांच्या लाकडापासून बनवलेले फर्निचर घरामध्ये उत्तम मानले जाते. या झाडांचे लाकूड मजबूत देखील आहे आणि त्याचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही.
* वास्तूनुसार फर्निचर ठेवण्याच्या दिशा देखील ठरवण्यात आल्या आहेत. फर्निचर खूप जड असेल तर ते घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे आणि हलके फर्निचर उत्तर-पूर्व दिशेला ठेवता येते.
* फर्निचर ईशान्य दिशेला जड फर्निचर ठेवल्यास त्याचा सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ लागतो, त्यामुळे पैशाशी संबंधित अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
* आपण ज्या खोलीसाठी खरेदी करत आहात त्या खोलीच्या आकारानुसार फर्निचर खरेदी करा हे लक्षात ठेवा. आवश्यकतेपेक्षा जास्त फर्निचर खरेदी करू नये.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.