Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेचे आजपासून "मिशन कवचकुंडल कोविड लसीकरण अभियान" : १८ वर्षावरील सर्व नागरीकांनी बाहयसंपर्क सत्रामध्ये कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन

महापालिकेचे आजपासून "मिशन कवचकुंडल कोविड लसीकरण अभियान" :  १८ वर्षावरील सर्व नागरीकांनी बाहयसंपर्क सत्रामध्ये कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा :  मनपा  आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनूसार कोविड लसीकरण मोहिम सुरु असुन महानगरपालिका क्षेत्रातील लस न घेतलेल्या १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना कोविड लस देणेकामी शुक्रवारी दिनांक ०८, ऑक्टोबर २०२१ ते १४, ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत “मिशन कवचकुंडल कोविड लसीकरण अभियान" राबविण्यात येणार आहे अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.  या कालावधीत कोविड लसीकरणाचा एकही डोस न घेतलेल्या व पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना दुसरा डोस देण्याकरीता बाहयसंपर्क कोविड लसीकरण सत्राचे नियोजन प्रत्येक प्रभागातील विविध भागामध्ये केले आहे.

तरी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त नागरीकांचे कोविड लसीकरण होण्याकरीता शुक्रवार दिनांक ०८, ऑक्टोंबर २०२१ ते १४, ऑक्टोंबर २०२१ रोजी “मिशन कवचकुंडल कोविड लसीकरण अभियान" अंतर्गत बायसंपर्क कोविड लसीकरण सत्राचे प्रत्येक प्रभागनिहाय महानगरपालिका मार्फत नियोजन करण्यात आले असून या कालावधीत कोविड लसीकरण बाहयसंपर्क सत्राचे ठिकाणी सकाळी १०.०० ते रात्री ६.०० या वेळेत १८ वर्षावरील सर्व नागरीकांना कोविड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून सर्व १८ वर्षावरील नागरीकांनी कोविड लसीचा डोस घ्यावा यासाठी असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.