Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ना.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या समितीला आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनीच वर्षपुर्ती झाली.

ना.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या समितीला आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनीच  वर्षपुर्ती झाली.

ना.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या समितीला आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनीच  वर्षपुर्ती झाली या वर्षाच्या अखेरी सहावी  मिटींग पार पडली यावेळी वर्षे भराचा आढावा घेतला यावेळी    या समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे म्हणाल्या की आजच्या  मिटींग मधे 192 प्रस्ताव दाखल झाले यापैकी 37 प्रकरणे निकाली काढावी लागली 155 प्रस्ताव मंजूर करण्यात आले या संपुर्ण वर्षभरात 656 प्रस्ताव दाखल झाले पैकी 115 अपात्र प्रस्ताव असल्याने निकाली काढण्यात आले त्यामुळे आजअखेर आम्हाला  541 लाभार्थ्यांना न्याय मिळवून देता आला तसेच या कोरोना मुळे ज्या माझ्या भगिनीच्या वाट्याला वैधव्य आले त्यांना तात्काळ लाभ देऊन त्यांना एक मायेचा आधार देताना समितीला समाधान वाटतय हे संपुर्ण वर्ष कोरोनाच्या सावटाखाली जात असताना देखील आमच प्रशासन व आमची समिती चोखपणे काम करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न केला आहे एव्हडेच नाही तर भागाभागात जाऊन त्यांना प्रस्ताव दाखल करण्याचे प्रक्षिशण ही देण्याचे काम आमच्या समितीमार्फत करण्या त आले जेणेकरून लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये त्यांची दलालाकडुन पिळवणूक होऊ नये.



तसेच बर्याच भागात मेळावे पार पडले अगदी वारांगणाच्या दारात सुध्दा या समितीला नेले सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडल्याने जणमानसात आमच्या समितीविषयी एक मायेचा आधार देणारी समिती अशी कौतुकाची धाप पडते त्याचच उदाहरण म्हणजे आज माझ्या बर्याच माता भगिनी खासकरून समितीला 1 वर्षे पुर्ण  झाल्याने सत्कार करण्यासाठी आणि आमच्या कामाला असेच बळ मिळावे यासाठी आशिर्वाद देण्यासाठी आले जनतेचे हे प्रेम बघुन आज आमचे मन भरून आले येथून पुढे आणि जोमाने काम करून दाखवु आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत पोहोचु आणि त्यांना विनासायास प्रस्ताव कसा मंजुर होईल याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली यावेळी लाभार्थ्यांच्या आणि सामाजिक संघटना च्या वतीने अध्यक्षा ज्योती आदाटे आणि या समितीचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर चंन्द्रकला यादव म्हणाल्या आम्हाला या अध्यक्षा ज्योती आदाटे यांचा आणि समिती चा सन्मान करताना अभिमान वाटतोय कारण ही समिती या महामारीच्या काळातसुध्दा जीवाची पर्वा न करता लाभार्थ्यांना सुलभ पद्धतीने लाभ मिळवुन देता यावा यासाठी धडपड करीत असते आजपर्यंत कधीही असे पाहिले नाही की या समितीच्या अध्यक्षा आणि सदस्य  भागाभागात फिरून मेळावे घेऊन लाभार्थ्यांपर्यत याचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करतात यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशी भावना व्यक्त केली यावेळी कसबे डिग्रज चे जेष्ठ कार्यकर्ते भरत कांबळे कमल शिर्के लक्ष्मी बंडगर सुनिता आमटे मुमताज मुलाणी कविता यादव   तसेच समिती सदस्य  आशाताई पाटील अनिता निकम आयेशा शेख  आप्पासाहेब ढोले बिपिन कदम भगवानदास केंगार संतोष भोसले नितीन काळे तसेच तहसीलदार के व्ही घाडगेसाहेब प्रभाग आधिकारी खरात साहेब तलाटी एम आय मुलाणी व एस आय खतिब लिपिक सचिन गुरव आणि असिश्टट प्रियांका तुपलोंडे ई उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.