अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर तिसऱ्या दिवशी आयकरचे छापे सुरूच
पुणे, अहमदनगर, नंदूरबार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगरमध्ये छापेसत्र सुरुच आहे. चौकशीत काय तथ्य समोर आल्याचे बोलले जात आहे. मात्र ही माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. आजही चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर छापेसत्र सुरु असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी केंद्र सरकारला जोरदार टोलाही लगावला. पाहुण्यांकडून चौकशी सुरु आहे, असे म्हणत केंद्र सरकारला टोकले. सलग तिस-या दिवशी आयकर खात्याकडून चौकशी सुरू आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगर, नंदूरबारमध्ये छापेसत्र सुरू आहे. चौकशीत काय तथ्य समोर आले आहे, याबाबत माहिती गुलदस्त्यात आहे.
कोल्हापुरात अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊस आणि घरावर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरूच आहे. तर पुण्यातही दोन ठिकाणी चौकशी सुरू आहे. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे पथक तळ ठोकून आहे. मोदीबागेत नीता पाटील आणि पंचवटीमध्ये रजनी इंदुलकर राहतात. दोन्ही ठिकाणी आयकरचे अधिकारी, कर्मचारी झडती घेत आहेत. नंदूरबारच्या आयान मल्टीट्रेड कारखान्यात काल रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाकडून चौकशी सुरू होती. आजही ही चौकशी सुरू राहील अशी शक्यता आहे.
अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालयावर ईडीचं छापासत्र सुरू आहे. नंदुरबार, बारामती, साताऱ्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. तर बारामतीत आयकर विभागाची छापेमारी रात्री उशीरापर्यंत होती सुरू होती. पुणे जिल्ह्यातील बारामतीत श्रायबर डायनामिक्स मिल्क डेअरीत आणि दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगरमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झाले. सलग तीन दिवसांपासुन तपासणी सुरु आहे.
अहमदनगरमध्येही सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झाले. तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून तपासणी आहे. तर नंदुरबारमधील समशेरपुरच्या आयान मल्टीट्रेड एलएलपी कारख्यान्यावर आयकर विभागाची टीम रात्री उशीरापर्यंत चौकशी करत होती. कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत आहे. तसेच कारखाना व्यवस्थापनानेही मौन बाळगले आहे. एका प्रमुख अधिकाऱ्यासोबत 12 ते 15 जणांचे पथक असल्याची सूत्रांची माहिती आहे. आजही चौकशी पुढे सुरु राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.