Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मताधिकार जनजागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा मोठ्या प्रमाणावर सहभागासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन

मताधिकार जनजागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा मोठ्या प्रमाणावर सहभागासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन


सांगली दि. २९  : मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणासाठी आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरिक्षण कार्यक्रम राबवत असते. यंदा हा कार्यक्रम 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कलावधीत राबविला जाणार आहे. या कालावधीत दिवाळी सणाचे औचित्य साधून मतदारांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

दिवाळी लोकशाही पध्दतीने साजरी करताना लोकशाहीची पहिली पायरी ही मतदार नोंदणी असते, हे लक्षात घेवून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना, नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी आवाहन करता येईल. आकाशदिवा व रांगोळी यामध्ये लोकशाही निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतीकांचा वापर करता येईल. उदा. डाव्या हाताचे अंगठ्याचे बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशी इत्यादी वापरता येईल. शिवाय मतदार नोंदणी, नाव वगळणी, तसेच मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्म दिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे, चुकीच्या तपशीलात दुरूस्त्या कराव्यात, याकरता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करता येईल. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in व स्पर्धेतील सहभागासाठी प्रणव सलगरकर यांच्या 8669058325 या क्रमांकावर तसेच https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.