मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याबाबत खात्री करावी - तहसिलदार प्रदीप उबाळे
सांगली, दि. 26, : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने 283-इस्लामपूर व 284 शिराळा (वाळवा तालुका गावे) विधानसभा मतदार संघामधील सर्व पात्र (18 वर्षे पूर्ण) मतदारांनी मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ठ असल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन 283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा वाळवा-इस्लामपूर तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे.
मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ असल्याबाबत www.ceo.maharashtra.gov.in व www.nvsp.in या संकेतस्थळावर खात्री करावी. ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ नाहीत त्यांनी दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमधील दि. 13 व 14 नोव्हेंबर तसेच 27 व 28 नोव्हेंबर 2021 या विशेष मोहिमेदिवशी आपल्या नजीकच्या मतदार केंद्रावर तसेच मतदार मदत केंद्र, निवडणूक शाखा, तहसिल कार्यालय, वाळवा इस्लामपूर येथे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी नमुना नं. 6 चा अर्ज आवश्यक कागदपत्रासह जमा करावेत. तसेच मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशनव्दारे मतदार आपले नाव नोंदवू शकतात. तसेच मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्ती करणे, मतदार यादीमधून नाव कमी करणे व एकाच मतदार संघामधील पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.