म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांनी भारत बळकट केला.. स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने
सांगली दि. २: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशासाठी बहुमोल योगदान दिले आहे. भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. बापूजी व शास्त्रींचे जीवन हेच महान संदेश देणारे आहेत. सत्य व अहिंसेच्या मार्गाने ते लढले.जय जवान जय किसान हा नारा शास्त्रींनी दिला. दोघेही राष्ट्रीय ऐक्याचे प्रतिक आहेत. असे प्रतिपादन स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांनी केले. महात्मा गांधीं व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी डॉ. नामदेव कस्तुरे यांनी ही महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध पहेलू मांडले अध्यक्षस्थानी कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील होते.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पृथ्वीराज बाबा पाटील, श्रीमती शैलजा भाभी पाटील व स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पृथ्वीराज पाटील, स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, श्रीमती शैलजा भाभी पाटील, सौ.मालनताई मोहिते, डॉ. नामदेव कस्तुरे, अजित ढोले, सुभाष खोत, पैगंबर शेख, देशभूषण पाटील, अमित पारेकर, अरुण पळसुले, श्रीधर बारटक्के, विठ्ठलराव काळे, मौलाली वंटमुरे, बाबगोंडा पाटील, रघुनाथ नार्वेकर, नामदेव पठाडे, ऍड.भाऊसाहेब पवार, श्रीकृष्ण जगताप, गणेश वाघमारे, विश्वास यादव, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, अनिल माने, अशोक वारे, नंदकुमार सुतार शिवाजी माळी, सचिन पाटील, मंदार सुतार, सचिन चव्हाण, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. स्वागत अजित ढोले यांनी केले तर आभार पैगंबर शेख यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.