हभप ताजोद्दीन शेख महाराज:हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक.. पृथ्वीराज पाटील
सांगली दि. २: प्रख्यात कीर्तनकार हभप ताजोद्दीन शेख महाराजांचे ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते मुस्लिम असून वारकरी संप्रदायाचे पाईक बनले. कीर्तन, भारुडे, गवळण, रामायण कथा, गीता व कुराणाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. गेली ४० वर्षे ते हिंदू देवी देवतांवर कीर्तन करायचे. संत साहित्याबरोबर छ. शिवाजी, छ. संभाजी व सावरकरांवर ते कीर्तनात भाष्य करायचे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व गुजरातमध्ये ते कीर्तन करायचे. ते हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक होते असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले. आज काँग्रेस भवनमध्ये सांगली काँग्रेसतर्फे आयोजित श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. हभप ताजोद्दीन शेख महाराजांच्या प्रतिमेला पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पृथ्वीराज पाटील, माधवराव माने, सौ.मालनताई मोहिते, अजित ढोले, सुभाष खोत, पैगंबर शेख, देशभूषण पाटील, अमित पारेकर, अरुण पळसुले, श्रीधर बारटक्के, विठ्ठलराव काळे, मौलाली वंटमुरे, बाबगोंडा पाटील, नामदेव पठाडे, रघुनाथ नार्वेकर, अँड.भाऊसाहेब पवार, श्रीकृष्ण जगताप, गणेश वाघमारे, विश्वास यादव, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, अनिल माने, अशोक वारे, नंदकुमार सुतार शिवाजी माळी, सचिन पाटील, मंदार सुतार, सचिन चव्हाण, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.