हा २३ वर्षाचा युवा नेता सक्षमपणे तोंड देत आहे .
स्वतःचे शिक्षण, मतदारसंघातील कामाचा पाठपुरावा त्यासाठी मंत्रालयातील या विभागातुन त्या विभागात करावी लागणारी पायपीट , त्यात दिवसभर मतदारसंघातून येणारे शेकडो फोन , मतदार संघातील कार्यक्रम, स्थानिक नेत्यांचे रुसवे फुगवे , तरुण सहकाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न, विरोधकांकडून केली जाणारी अडवणूक व केवळ टार्गेट करण्यासाठी खोडसळपणे केली जाणारी टीका .
या सर्वाला हा २३ वर्षाचा युवा नेता सक्षमपणे तोंड देत आहे . या सर्व भूमिका वयाच्या इतक्या लहान वयात वठवत असतांना त्याचा तोल कधीही गेलेला दिसत नाही. त्याने कधी कामाचा स्वतःच्या निराशेचा बडगा आपल्या सहकाऱ्यांवर काढलेला दिसत नाही. नेहमी जे काम झाले त्यासाठी समाधान व्यक्त करणारा जे काम झालं नाही त्यासाठी हसतमुखाने परत जोमाने पाठपुरावा करणारा रोहित आर .आर पाटील.
हा फोटोचे निरीक्षण नीट केल्यास रोहित च्या हातात कोणतेही घड्याळ दिसत नाही , या सगळ्या धावपळीतुन वेळ मिळाला तर अर्धा तास चालता यावे म्हणून घातलेला स्पोर्ट्स शूज दिसतो , कपडे कोणत्याही सर्व सामान्य तरुणासारखेच . तरीही आज या तरुणाच्या सक्रीयतेमुळे व आबांच्या पुण्याईमुळे रोहित पाटील हे नाव अनेक मोठ्या नेत्यांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.
सर्व पक्षातील अनेक दिग्गज रोहितचे कौतूक तर करतातच पण अनेकांना या २३ वर्षाच्या तरुणाबरोबर फोटो देखील काढायचा असतो .
मिसरुडी फुटायच्या वयात एवढा व्याप सक्षमपणे सांभाळणारा हा तरुण एकेदिवशी या राज्यात मोठी कामगिरी करेल या बाबत मला शंका नाही .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.