Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी’ एकता रॅलीस प्रचंड प्रतिसाद

 सांगली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी’ एकता रॅलीस प्रचंड प्रतिसाद:



सांगली ३० ऑक्टोंबर : भारताचे पहिले गृहमंत्री व पोलादी पुरुष कै. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ एकता रॅली व बालमैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच आणि सांगली स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात आमदार सुधीरदादा गाडगीळ, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हापोलीस प्रमुख दीक्षित गेडाम आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी भाजपचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री. प्रकाश बिरजे यांनी सरदार पटेलांच्या कार्याची माहिती दिली. ‘५६२ संस्थानाचे विलणीकरण हि सरदारांनी भारताला दिलेली मोठी देणगी होय. जिथे समझोता शक्य झाला नाही तिथे सैन्यबळाचा वापर करून संस्थानाचे विलगीकरण केले, म्हणूनच त्यांना पोलादी पुरुष म्हटले जाते.’

 

यानंतर आमदार गाडगीळ, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ध्वज फडकवून दौडीला सुरवात केली. आमराई पटेल चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, आझाद चौक अशी रॅली होऊन छत्रपती शिवाजी स्टेडियम ला समारोप झाला. यामध्ये सुमारे ६०० तरुण खेळाडू सहभागी होते. 


तसेच एकता रॅली नंतर छत्रपती शिवाजी स्टेडियमवर बालमैदानी स्पर्धेचे उद्घाटन आ. सुधीरदादा गाडगीळ व माजी उपमहापौर प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. “२०१७ साली जेव्हा एकता दौडीच आयोजन करण्यात आले होते, नंतर कोवीडच्या निर्बंधामुळे  हि दौड फार मोठ्या प्रमाणात घेऊ शकलो नाही. परंतु आज या दौडीच आयोजन केलेलं असून, सरदार वल्लभभाईच्या विचारातून प्रेरणा घेऊन, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, लॉकडाऊन, महापुरानंतरची मरगळ झटकून हि दौड यशस्वी केली ” असे आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य  शेखर इनामदार, प्रदेश कार्यकारणी सदस्या   निताताई केळकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, भाजपा प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, गटनेते विनायक सिंहासने, समाजकल्याण सभापती सुब्रावतात्या मद्रासी, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे- पाटील, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अश्रफ वांकर, नगरसेवक युवराज बावडेकर, लक्ष्मण नवलाई, प्रकाश ढंग, नगरसेविका कल्पना कोळेकर, सविता मदने, अनारकली कुरणे, उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, प्रदेश महिला मोर्चा सदस्या स्मिता पवार, युवती संयोजिका दिव्या कुलकर्णी, प्रीती काळे, दरीबा बंडगर, रवींद्र सदामते, प्रियानंद कांबळे, धनेश कातगडे, रवी बाबर, अमित गडदे, इम्रान शेख, गणपती साळुंखे, सचिन बालनाईक, गौस पठाण, सुजित राउत, शांतीनाथ कर्वे, प्रथमेश वैद्य, चेतन माडगुळकर, अनिकेत खिलारे, निलेश हिंगमिरे, शरद नलवडे, जयवंत पाटील, सुहास कलगुटगी, रघुनाथ सरगर, संजय परमणे, राजू बावडेकर, जितीन शहा, अविनाश सावंत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते खेळाडू तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ‘रन फॉर युनिटी’ एकता रॅली व बालमैदानी स्पर्धेचे नियोजन आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे विश्वजित पाटील आणि सांगली स्पोर्ट्स फाउंडेशनचे एस.एल. पाटील सर यांनी केले होते..


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.