Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आगाऊ वेतन

 कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आगाऊ वेतन



कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत हा सुवर्णक्षण म्हणावा लागेल, सुवर्णक्षण यासाठी की, महावितरण च्या इतिहासात प्रथमच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना महिना भरण्यापूर्वी त्या महिन्याचे वेतन बँक खात्यात जमा होण्याची ही पहिली वेळ आहे.

हा प्रकार सांगली शहर विभाग येथे घडला आहे. त्यामुळे येथील कंत्राटी विजकर्मचारी आनंदी दिसत आहेत. सद्या सांगली शहर विभागाचे बाह्यस्रोत चे कंत्राट दिल्लीच्या G A डिजिटल वेब वर्ड प्रा. लि. यांना असून किमान नफ्याच्या अपेक्षेने त्यांनी उत्तम सेवा देऊ केली आहे. 

महावितरण कोल्हापूर परिमंडळाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे साहेब व सांगली शहर विभागाचे मा.कार्यकारी अभियंता श्री. खांडेकर साहेब यांच्या मोलाच्या प्रयत्नातून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 

अजूनही महावितरणच्या बऱ्याच विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे २-३ महिन्याचे वेतन थकीत आहे ही बाब खेदाने नमूद करावी वाटते. मात्र सांगली शहर विभागात ज्या प्रकारचे प्रयत्न व कंत्राटी कर्मचार्यांप्रती आस्थेने वेतन दिले गेले तसे प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रात होण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करेल असे मी राज्यसंघटक म्हणून आश्वासन देत आहे.

सुनील वाघमारे

राज्यसंघटक, महाराष्ट्र राज्य कंत्राटी विजकामगर संघटना


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.