Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय पेन्शन योजना हटाव आणि जुनी पेन्शन योजना बचाव यासाठी राज्यभर ठिय्या आंदोलन.. पी एन काळे, पुणे विभागीय सचिव

राष्ट्रीय पेन्शन योजना हटाव आणि जुनी पेन्शन योजना बचाव यासाठी राज्यभर ठिय्या आंदोलन.. पी एन काळे, पुणे विभागीय सचिव


सांगली. : राज्य सरकारी कर्मचारी शुक्रवार दि. 29 तारखेला राज्यभर सर्वांना जुनी पेन्शन मिळावी.यासाठी सर्व शासकीय कार्यालय समोर सकाळ सत्रामध्ये एक तासाचे ठिय्या आंदोलन करणार आहेत. अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे विभागाचे सचिव पी एन काळे यांनी दिली. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारणी मध्ये हा निर्णय घेण्यात आला असे ते म्हणाले.  1 नोव्हेंबर 2005 पासून राज्य शासनाने परिभाषित अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) राज्य कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. सन 2015 पासून या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजे (एनपीएस) मध्ये झाले. गेल्या 16 वर्षात संबंधित (एनपीएस) धारक कर्मचारी यांचे आनुज्ञेय हक्क डावलल्यामुळे कमालीचे भरडले जात आहेत. अकाली निधन पावलेल्या सुमारे  1600 कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आर्थिक बाबतीत पूर्ण उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ही राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्दबातल होणेच सर्व राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहे. 

म्हणून या राज्यव्यापी ठिय्या आंदोलना द्वारे महाविकास आघाडी सरकारला आम्ही साकडे घालीत आहोत. (एनपीएस) योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करा. देशभरातील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. अशी शिफारस  तेथील विधानसभा ठरावाद्वारे केंद्र सरकारकडे केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याची शिफारस तात्काळ करावी. मधल्या कालावधीत केंद्रीय कर्मचारी प्रमाणे एमपीएस कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या सर्व लाभ (कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी वगैरे) राज्यातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 10 टक्के शासन औषधांना अंशदान ऐवजी सुधारित 14 टक्के अंशदान रकमेची वजावट आयाकरासाठी एकूण उत्पन्नातून अनुज्ञेय करण्यात यावी. 

पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन ( 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी) नवीन सेवा स्वीकारलेल्या तसेच नोव्हेंबर 2005 पूर्वी निवड झालेल्या परंतु उशिरा नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना ही जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करा. या मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2019 रोजी आपापल्या कार्यालयासमोर सकाळच्या सत्रात एक तास ठिय्या आंदोलन करावे. असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा सांगली यांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी संघटनेचे जे.के.महाडिक,  डी.जी मुलाणी,  एस.एच. सूर्यवंशी राजेंद्र कांबळे,संजय व्हणमाने,गणेश धुमाळ  इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.