राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मिरज तालुक्यातील ढवळी गावात महिला मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या
राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मिरज तालुक्यातील ढवळी गावात महिला मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.राष्ट्र सेवा दलाचे किरण कांबळे यांनी प्रथम त्यांचे व प्रियांका तुपलोंडे यांचे स्वागत केले त्यानंतर प्रास्ताविक करताना म्हणाले आज आपल्याकडे राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि् विमाव्यवसायात अग्रेसर असणार्या धडाडीच नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतोय अशा या ज्योतीताई आदाटे आणि त्यांच्यासोबत सातत्याने त्यांची साथ देणार्या त्यांच्या सारथी प्रियांका तुपलोंडे या ठीकाणी आपणास विविध विषयांवर प्रबोधनपर मार्गदर्शन करावयास आल्या आहेत त्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा.त्यानंतर ज्योती आदाटे आपल्या भाषणात म्हणतात की राष्ट्र सेवा दलाने हा जो उपक्रम चालु केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे अगदी ग्रामीण भागातील महिलांच्या प्रगतीसाठी तसेच लहान मुलांच्या जडणघडणासाठी एक उत्तम माणुस बनन्यासाठी सेवा दल शिबीरे मेळावे घेऊन कृतीशील कार्यक्रम करीत असते माझी ही सुरूवात राष्ट्र सेवा दल आणि एस एफ आय या विद्यार्थी संघटनेतुनच झाली आहे. मी सुद्धा सेवा दलाची सैनिक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
महिलांना उद्देशून ज्योती ताई म्हणाल्या की महिलांनी आपला आत्मसन्मान जपला पाहिजे स्वावलंबनातुनच सबलता येते हे पटवून दिले उद्योग करण्याचा प्रयत्न करा भले ही तो छोटा असेल लाज बाळगु नका मार्केटिंग क्षेत्रात महिला कमी पडतात त्यात ही चांगली प्रगती करू शकताय मनावर घ्या प्रयत्न करा निश्चितच यश मिळेल आणि निर्णय घ्यायला शिका भले ही तो चुकेल पण निर्णय घ्या तुमच्यामध्ये निर्णय क्षमता वाढेल तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्याध्यक्षा म्हणुन त्या अंधश्रद्धेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की आपण काय वागतोय कशी कृती त्यावरच आपली पुढची पिढी घडते आपली पिढी अंधश्रद्धेच्या खाईत लोटायला आपणच कारणीभूत असतोय याचा गांभीर्याने विचार करा कारण लहान मुल आपलच अनुकरण करीत असतात लहाणपणापासुनच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविणे गरजेचे आहे हे पालकांनीच केले पाहिजे जे आम्ही करतोय. भोंदूबाबा पकडताना त्यांना व त्यांच्या समितीला आलेले थरकाप उडवणारे अनुभवाचे कथन केले अनेक वेळा जीवावर उदार होऊन काम करावे लागते जीव धोक्यात घालुन काम करावे लागते प्रसंगी बदनामी ला तोंड द्यावे लागते पण अस घाबरून चालत नाही प्रवाहाच्या विरोधातील ही लढाई आहे.
सर्वसामान्यांच्या आर्थिक शारिरीक मानसिक आणि भावनिक शोषणाविरोधातील लढा हा लढलाच पाहिजे. संजय गांधी निराधार योजना समिती च्या अध्यक्षा म्हणून त्या बोलताना म्हणाल्या या योजनेचा फायदा घ्या स्वतः ही घ्या आणि इतरांनाही मदत करा आपली सामाजिक बांधिलकी आहे याच नेहमीच भान ठेवा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा म्हणून त्यांनी महिलांनी राजकारणात यावे असे आवाहन केले त्या पुढे म्हणाल्या की राजकारणात येऊनही समाजकारण करता येत याच ज्वलंत उदाहरण मी स्वत आहे त्यासाठी जिथे जिथे आपणास अडचण येईल तिथे आम्ही आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.