Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पूरबाधित 71 हजार कुटुंबाना 71 कोटी 43 लाखाहून अधिक सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वितरीत -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

पूरबाधित 71 हजार कुटुंबाना 71 कोटी 43 लाखाहून अधिक  सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वितरीत -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 2, : जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यातील जी कुटुंबे बाधीत झाली आहेत त्या प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रूपये प्रमाणे मदत देण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील असे एकूण 71 हजार 438 बाधीत कुटुंबाना 71 कोटी 43 लाख 80 हजार रूपये इतके अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित बाधित कुटुंबासाठी सानुग्रह अनुदान वाटप प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

आत्तापर्यंत सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेल्या तालुकानिहाय बाधित कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्र - 30 हजार 495, मिरज ग्रामीण क्षेत्र - 1 हजार 202, अपर सांगली ग्रामीण क्षेत्र - 9 हजार 988, वाळवा - 9 हजार 906, अपर आष्टा - 3 हजार 522, शिराळा - 1 हजार 653, पलूस - 14 हजार 672.

मयत पशुधन अनुदान वाटप

वाळवा, अपर आष्टा, शिराळा व पलूस तालुक्यातील एकूण 75 लाभार्थ्यांना 18 लाख 36 हजार रूपये मयत पशुधनासाठी अनुदान वाटप करण्यात आले असून मिरज तालुक्यामध्ये अनुदान वाटप प्रकिया सुरू आहे. तालुकानिहाय मयत पशुधन अनुदान वाटप पुढीलप्रमाणे. वाळवा - 36 लाभार्थ्यांना 7 लाख 94 हजार रूपये, अपर आष्टा - 10 लाभार्थ्यांना 3 लाख 7 हजार रूपये, शिराळा - 8 लाभार्थ्यांना 2 लाख 45 हजार रूपये, पलूस - 21 लाभार्थ्यांना 4 लाख 90 हजार रूपये.

शेतजमिनीचे नुकसान अनुदान वाटप

वाळवा व शिराळा तालुक्यात 2 कोटी 13 लाख 82 हजार 600 रूपये इतके अनुदान शेतजमिनीच्या नुकसानीपोटी वाटप करण्यात आले असून मिरज व पलूस तालुक्यात अनुदान वाटप प्रक्रिया सुरू आहे.

तसेच घर पडझड, गोठे, झोपड्या, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, जमिन खरडून जाणे इत्यादीचे अनुदान वाटप प्रकिया सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.